S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांची सांगलीत अज्ञातांकडून हत्या

murder of ex corporator bhoite in pandharpur

Samruddha Bhambure | Updated On: Apr 18, 2017 10:28 AM IST

पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांची सांगलीत अज्ञातांकडून हत्या

18 एप्रिल : पंढरपूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भुईटे यांची सांगलीत कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास सांगलीतील मिरज इथल्या भोसे फाट्यावर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. भर चौकात माजी नगरसेवकाची अशाप्रकारे हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

नामदेव भुईटे चार मित्रांसह मिरज येथून रात्री परत येत असताना काही अज्ञातांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी हल्ला करता त्यांच्यासोबत असलेले मित्र आणि गाडीचा चालक यांनी घाबरून घटनास्थळावरुन पळ काढला. भुईटे यांना तातडीने मिरज इथल्या विशाखा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

सांगली पोलिसांनी आता भुईटे यांच्यासोबत असलेल्या गाडी चालकाची चौकशी सुरु केली असून त्यांसोबतच्या मित्रांचाही शोध सुरु केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2017 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close