माजी नगर उपाध्यक्षाची हत्या, भरदिवसा लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचलं

माजी नगर उपाध्यक्षाची हत्या, भरदिवसा लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचलं

यवतमाळच्या दारव्हा शहराचे माजी नगर उपाध्यक्ष आणि सभापती सुभाष दुधे यांची भरदिवसा दगडाने आणि लोखंडी रॉडने ठेचून हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 14 ऑक्टोबर : यवतमाळच्या दारव्हा शहराचे  माजी नगर उपाध्यक्ष आणि सभापती सुभाष दुधे यांची भरदिवसा दगडाने आणि लोखंडी रॉडने ठेचून हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सुभाष दुधे यांची हत्या करण्याआधी आरोपींनी त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. सकाळी 10च्या सुमारास दारव्हाच्या बारीपुरा इथे ही घटना घडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून यवतमाळमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं. या प्रकरणासंदर्भात दारव्हा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून सुभाष यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर इतक्या निर्घृणपणे सुभाष यांची हत्या का करण्यात आली याचा आता पोलीस शोध घेत आहे.

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शीं आणि हत्या करण्यात आलेल्या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस पुढील तपास करणार आहेत. तर यात सुभाष यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, सुभाष दुधे यांच्या अशा हत्येमुळे दुधे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर दारव्हा गावातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

VIDEO : कोल्हापुरात ड्रोन कॅमेराने टिपली अंबाबाईच्या मंदिरावरील विविधरंगी उधळण

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2018 12:38 PM IST

ताज्या बातम्या