Elec-widget

पोलीस स्टेशनमध्ये हत्या, मुलांच्या भांडणावरून घडली घटना

पोलीस स्टेशनमध्ये हत्या, मुलांच्या भांडणावरून घडली घटना

जैन विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन सुरू होतं. या कार्यक्रमामध्ये काळे आणि गव्हाणे या दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.

  • Share this:

मनोज जयस्वाल, प्रतिनिधी

वाशिम, 15 जानेवारी : जिल्ह्याच्या अनसिंग भागातील पोलीस स्टेशनमध्येच एक पालकानं दुसऱ्या पालकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

घडलेली हकीकत अशी की, शहरातील जैन विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन सुरू होतं. या कार्यक्रमामध्ये काळे आणि गव्हाणे या दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यावरून पालकांमध्ये जुंपली होती, हा वाद विकोपाला गेला.

त्यामुळे संजय काळे हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलीस स्टेशनच्या आवारातच गव्हाणे आणि एका सहकाऱ्यानं संजय काळेंच्या डोक्यावर रॉडनं हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले.

त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण, त्यांचा मृत्यू झाला. हा सगळा प्रकार घडत असताना पोलीस काय करत होते, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे.

Loading...

=====================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2019 07:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...