फाटलेल्या 10 रुपयांवरून भाजी विक्रेत्याने केली ग्राहकाची हत्या

दादरमध्ये अवघ्या 10 रुपयांच्या वादातून भाजी विक्रेत्याने एका ग्राहकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 05:41 PM IST

फाटलेल्या 10 रुपयांवरून भाजी विक्रेत्याने केली ग्राहकाची हत्या

मुंबई, 27 जून- दादरमध्ये अवघ्या 10 रुपयांच्या वादातून भाजी विक्रेत्याने एका ग्राहकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी आरोपी भाजी विक्रेता सोनीलाल सुखदेव महंतो (वय-25) याला अटक केली आहे. हनीफ मोहम्मद सिद्दीकी (वय-35) असे मृत ग्राहकाचे नाव आहे.

काय आहे हे प्रकरण?

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपीचा दादर स्टेशनच्या बाहेर भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. हनिफ हे सोमवारी (24 जून) रात्री साडे दहा वाजता भाजी घेण्यासाठी आरोपीच्या दुकानावर गेले होते. हनिफ यांनी भाजी खरेदी केल्यानंतर भाजी विक्रेत्याला 10 रुपयांची नोट दिली. नोट जुनी आणि फाटलेली असल्याने भाजी विक्रेत्याने ती घेण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाऊन आरोपीने भाजी कापण्याच्या चाकूने हनिफ यांच्यावर दोनदा वार केले. हनिफ रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. हे पाहताच आरोपीने पळ काढला. नागरिकांनी हनिफ यांना तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये हलवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपीला सीएसटीएम रेल्वे स्टेशनवरून अटक केली. तो पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.

Eng vs Ausसामन्यावर सट्टा लावणाऱ्या PSIला बेड्या

विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय) रंगेहात अटक करण्यात आली आहे. दादर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ज्ञानेश्वर खरमाटे असे आरोपी पीएसआयचे नाव असून त्याच्यासह दोघांना पोलिसांनी दादरमधील एका हॉटेलमधून अटक केली आहे.

Loading...

ज्ञानेश्वर खरमाटे हा भायखळा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. या कारवाईनंतर त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या विश्वचषक सुरु असल्यामुळे प्रत्येक सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे.

मिकीन शहा नावाचा व्यक्ती इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर फोनवरुन बेटिंग लावत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस पथकाने दादरमधील एका हॉटेलवर धाड टाकली. यात दोन जण सट्टा खेळताना आढळून आले. या कारवाईत क्रिकेट बुकी मिकीन शाह आणि त्याचे दोन साथीदार मनीष सिंग आणि प्रकाश बनकर हे सट्टा लावत होते. यावेळी पीएसआय ज्ञानेश्वर खरमाटे हा देखील तिथेच होता. मिकीन शहा आणि दोन आरोपींसहित ज्ञानेश्वर खारमाटे याला अटक करण्यात आली. आरोपींकडून 1 लाख 93 हजार 200 रुपये रोख आणि सहा मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता सगळ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

VIDEO: अमानुषतेचा कळस! अर्धनग्न करत तरुणाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...