News18 Lokmat

बहिणीशी बोलत असल्याचा राग, सख्या भावांनी केली 14 वर्षांच्या मुलाची हत्या

आरोपींनी हत्या केल्यानंतर यातून वाचण्यासाठी एक बनावही रचला. संबंधित मुलाची खंडणीसाठी हत्या केली गेली आहे, अशा अफवा पसरवण्यात आल्या.

News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2018 11:46 AM IST

बहिणीशी बोलत असल्याचा राग, सख्या भावांनी केली 14 वर्षांच्या मुलाची हत्या

बीड, 17 डिसेंबर : आष्टीमध्ये दोन सख्या भावांनी त्यांच्याच गावातील 14 वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. केरूळ गावात घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

आपल्या बहिणीला गावातील सातवीत शिकत असलेला मुलगा बोलत असल्याचा राग मनात धरून सख्या भावांनी त्या मुलाची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी अर्जुन लक्ष्मण गर्जे (वय18) आणि दीपक गर्जे (वय 17) या दोन आरोपींना अटक केली आहे.

धक्कादायक म्हणजे या आरोपींनी हत्या केल्यानंतर यातून वाचण्यासाठी एक बनावही रचला. संबंधित मुलाची खंडणीसाठी हत्या केली गेली आहे, अशा अफवा पसरवण्यात आल्या. पण पोलीस चौकशीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

मुलांमधील भांडण आणि थेट हत्या झाल्याने या प्रकरणाची आष्टीमध्ये मोठी चर्चा होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात लगेच काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.


Loading...

VIDEO: 'मी सिंधिया नाही शिंदे पाटील, माझं रक्त मराठी'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2018 11:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...