फटाके फोडण्याच्या वादातून धुळ्यात तरूणाची हत्या

दिनेश प्रल्हाद चौधरी असं मयत व्यक्तीचं नाव आहे. शहरातील मनमाड जीन परिसरात दिनेश प्रल्हाद चौधरी हा इसम फटाके फोडण्यासाठी चौकात आला होता. त्यावेळी तुषार शिंदे, भैय्या सरोदे याच्यासह असलेल्या इतर तरूणांनी दिनेशला हटकत वाद घातला

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2017 02:57 PM IST

फटाके फोडण्याच्या वादातून धुळ्यात तरूणाची हत्या

धुळे,20 ऑक्टोबर: धुळे शहरात फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात एका तरूणाचा खुन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन तरूण गंभीर जखमी देखील झाले आहेत.

दिनेश प्रल्हाद चौधरी असं मयत व्यक्तीचं नाव आहे. शहरातील मनमाड जीन परिसरात दिनेश प्रल्हाद चौधरी हा इसम फटाके फोडण्यासाठी चौकात आला होता. त्यावेळी तुषार शिंदे, भैय्या सरोदे याच्यासह असलेल्या इतर तरूणांनी दिनेशला हटकत वाद घातला. त्यानंतर चौघांनी दिनेशला घेरलं. त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. या हल्ल्यात दिनेशचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान दिनेशवर हल्ला करणाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. यात तुषार आणि भैय्या सरोदे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या खुनातील अन्य दोन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचं बोललं जातंय. या घटनेमुळे ऐन दिवाळीत मनमाड जीन परिसरात शोककळा पसरली आहे. या भागात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्यामुळे आता शांततेचं वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2017 02:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...