डेडलाईन...डेडलाईन...डेडलाईन

डेडलाईन...डेडलाईन...डेडलाईन

आज 31 जुलै असल्याने मुंबई विद्यापीठाचे निकाल, पीक विमा, इन्कम टॅक्स रिटर्न आणि रेरा नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस.

  • Share this:

31 जुलै : आज 31 जुलै असल्याने मुंबई विद्यापीठाचे निकाल, पीक विमा, इन्कम टॅक्स रिटर्न आणि रेरा नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस. मुंबई विद्यापीठाने 153 शाखांचे निकाल जाहीर केले आहे पण अजून 340 शाखांचा निकाल बाकी असल्याने विद्यापीठाची डेडलाइन चुकली आहे.

दुसरीकडे पीक विमा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने राज्यात बँकांबाहेर शेतकऱ्यांनी गर्दी केलीय. तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी पीकविमापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.तसंच मुदत वाढ नसल्याने आज इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटी तारीख आहे. त्यामुळे जर उद्यापासून दंड टाळायचा असेल तर आज त्वरित इन्कम टॅक्स रिटर्न भरा.

त्याचप्रमाणे आज बिल्डरांसाठीही महत्त्वाचा दिवस आहे. बांधकाम व्यावसायिकांना रेरा नोंदणी करण्याची मुदतही आज संपणार आहे. नोंदणी न करणाऱ्या विकासकांवर रेरा प्राधिकरण कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2017 02:23 PM IST

ताज्या बातम्या