महाराष्ट्र: 'भाजप-शिवसेना यांच्यात ठरला प्रत्येकी अडीच वर्षाचा मुख्यमंत्री'

महाराष्ट्र: 'भाजप-शिवसेना यांच्यात ठरला प्रत्येकी अडीच वर्षाचा मुख्यमंत्री'

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटपासंदर्भातील एक मोठा खुलासा

  • Share this:

मुंबई, 11 जून: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटपासंदर्भातील एक मोठा खुलासा युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केला आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे. वरुण सरदेसाई यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात निर्णय झाला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचा प्रत्येकी अडीच-अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री असेल. जे लोक हा फॉर्म्युला निश्चित करताना उपस्थित नव्हते त्यांनी स्वार्थासाठी युती तोडण्याचा प्रयत्न करु नये, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

वाचा-अखेर ठरलं...या तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

युवासेनेच्या सचिवांच्या या ट्विटवर भाजप अथवा शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण सरदेसाई यांच्या या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे.राज्यातील युती सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. राज्यात यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपकडे सर्वाधिक 122 जागा आहेत. तर शिवसेनेकडे 63 जागा आहेत. विरोधी पक्षात काँग्रेकडे 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 41 जागा आहेत.

लोकसभा निवडणुकीत होय नाही करत अखेर भाजप-शिवसेना यांची युती झाली होती. दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्याचा फायदा देखील युतीला मिळाला. भाजपने 23 जागा तर शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला होता. राज्यात विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीला 4 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती.


गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या