LIVE NOW

#MumbaiRainlive : पुढचे 48 तास मुसळधार पावसाचे, वेधशाळेचा अंदाज

आज दिवसभरातील सर्वात महत्त्वाचे LIVE अपडेट...

Lokmat.news18.com | July 2, 2019, 7:25 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 2, 2019
auto-refresh

Highlights

मुंबई, 02 जुलै : शनिवारपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये पाणी साचलं आहे.संपूर्ण मुंबईची तुंबई झाली आहे. तर अनेक ठिकाणी मोठे अपघात होत जीवितहानी झाली आहे. राज्य सरकारने मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यातील सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर खासगी आणि सरकारी कार्यालयातही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट...
3:05 pm (IST)

मालाड दुर्घटनेमध्ये अडकलेल्या मुलीपर्यंत अग्निशमन अधिकारी पोहोचले आहेत. पण ढिगाऱ्याखालून मुलीला बाहेर काढण्यात अडथळे येत असल्याची माहिती देण्यात आली. यावर उपाय म्हणून मुलीपर्यंत उपचार पोहोचवण्याची सोय करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यात आलं आहे. 

 


Load More