S M L

VIDEO कसारा रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर गुरांचा गोठा !

आता माणसांचेच इतके हाल होतात तर त्यात प्राणीमात्रांबाबत तर काही विचारूच नका.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2018 08:08 AM IST

VIDEO कसारा रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर गुरांचा गोठा !

कसारा, 11 जुलै : गेल्या 4 दिवसांपासून पावसाने सगळ्यांचेच हाल केले आहेत. आता माणसांचेच इतके हाल होतात तर त्यात प्राणीमात्रांबाबत तर काही विचारूच नका. गोठा नसल्याने चक्क कसारा रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावरच गुरांचा गोठा झाल्याचं पहायला मिळालं. एवढ्या मुसळधार पावसाचे अनेकांचं नुसकान झालं आता त्याकडे पहायला सरकारला वेळ नाही मग हे प्राणीमात्र तर लांबच राहिले असं म्हणावं लागेल.

गेले 4 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने गावातील गुरं भिजू नये यासाठी शेड शोधत असतात. मात्र गावात शेड सापडत नसल्याने गुरांनी चक्क रेल्वेच्या पादचारी पुलाचा वापर केला आहे. मात्र याचा फटका प्रवाश्यांना होत आहे. या गुरांना संपूर्ण पादचारी पुलाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात येण्या-जाण्यासाठी प्रवाशांना अडचणी येत आहे.

हेही वाचा...


तुटलेला रेल्वे रूळ चिंधीनं बांधला,लोकलही नेली

VIDEO : ओव्हरटेक नडला, ट्रकला रिंगण घालून कार उलटी फिरली

याबाबत कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे सद्यस शैलेश राऊत यांनी सांगितले याबाबत आम्ही रेल्वे आणि ग्रामपंचायतकडे तक्रार केली आहे आणि गावकऱ्यांनी सुद्धा आपल्या गुरांना पावसात न ठेवता आपल्या जागेत शेड बांधून त्यात ठेवावे असे आवाहन केले आहे.

Loading...

हेही वाचा...

थायलंडच्या मुलांच्या सुटकेचं हे आहे महाराष्ट्र कनेक्शन

अघोरी सासुरवास;पैशासाठी पतीने पत्नीची जीभ कापली, मुलीलाही पाण्यात बुडवलं

VIDEO : अतिविषारी घोणसच्या 96 पिल्लांचा जन्मोत्सव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2018 08:08 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close