17 तासानंतर संपलं थरारनाट्य, MAHALAKSHMI EXPRESS मध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका

तब्बल 17 तासांच्या थरारानंतर NDRFच्या पथकानं सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 04:51 PM IST

17 तासानंतर संपलं थरारनाट्य, MAHALAKSHMI EXPRESS मध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका

मुंबई, 27 जुलै : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली. या ट्रेनमध्ये अडकलेल्या 600 प्रवाशांची अखेर 17 तासांनंतर सुटका करण्यात यश आलं आहे.

रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली. या ट्रेनला चहुबाजूंनी पावसाच्या पाण्यानं वेढा घातला होता. जवळपास 2000 प्रवासी एक्स्प्रेसमध्ये अडकल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तब्बल 17 तासांच्या थरारानंतर NDRFच्या पथकानं सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका केली आहे.

NDRFकडून सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका

पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण येत होता. पण एनडीआरएफच्या टीमने अथक परिश्रम केल्याने सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. त्यांच्या जेवणाची आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच या प्रवाशांना बदलापूरला नेऊन त्यांना मनमाडमार्गे कोल्हापूरला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

Loading...

कसं पार पडलं रेस्कू ऑपरेशन?

- मुंबईतून 50 जणांची टीम एकूण 6 बोटीच्या सहाय्याने बचावकार्यात सहभागी

- पुण्यातून 40 जणांची टीम आणखी 5 बोटींसह बचावकार्य करण्यासाठी बदलापूरमध्ये झाली होती दाखल

- अडकलेल्या प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी नौसेना आणि एनडीआरएफ टीम प्रमुख यांना राज्य सरकारने मदतीसाठी संपर्क केला. हेलिकॉप्टर तसंच इतर सुविधा द्यावी, अशी मागणी केली होती.

- प्रवाशांना वाचवण्यासाठी नेव्हीचे सी किंग हेलीकॉप्टर घटनास्थळी पोहचलं. याच हेलिकाँप्टरमध्ये नेव्हीचे पाणबुडे ही रेस्कू बोट आणि इतर बचाव साहित्यासह पोहचले

- त्यानंतर सलग काही तासांच्या मेहनतीनंतर सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका

दरम्यान, महालक्ष्मी एक्स्प्रेस मध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना बदलापूरहून कल्याणला आणलं जाणार आहे. त्यानंतर कल्याणवरुन कसारा, इगतपुरी मनमाडमार्गे विशेष रेल्वे कोल्हापूरला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

थरारक 'ऑपरेशन महालक्ष्मी'चा संपूर्ण GROUND ZERO रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2019 04:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...