पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक दुपारपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक दुपारपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता

खंडाळा घाटात एकूण तीन रेल्वे लाईन पैकी मिडल लाईनच काम पूर्ण झालेलं आहे

  • Share this:

पुणे,08 सप्टेंबर: गुरूवारी खंडाळा घाटात मालगाडीला झालेल्या अपघातामुळे लोणावळा पुणे मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. आता ट्रॅक दुरूस्तीचे काम वेगाने पूर्ण होत असल्यामुळे दुपरपर्यंतही वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

सध्या रेल्वे ट्रॅक दुरूस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. शेकडो कर्मचारी रेल्वे ट्रॅक दुरुस्तीच्या कामात काल पासून झटत आहेत. खंडाळा घाटात एकूण तीन रेल्वेलाईन पैकी मिडल लाईनच काम पूर्ण झालेलं आहे. तर डाऊनसाईड लाईन, जिथे अपघात झाला ती लाईन दुपारपर्यंत दुरुस्त होईल. दरम्यान मुंबईकडे जाणारी अपलाईन आणि मिडललाईन सध्या सुरु करण्यात आली आहे. दरम्यान सकाळी ६ वाजता सिंहगड एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाली आहे तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2017 08:58 AM IST

ताज्या बातम्या