महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8 दिवस 'या' मार्गावर गाड्या बंद

गेल्या महिन्यात लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याच्या काही घटना घडल्या.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 12:50 PM IST

महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8 दिवस 'या' मार्गावर गाड्या बंद

पुणे, 24 जुलै : लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वेकडून दुरुस्ती कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. 26 जुलै ते 9 ऑगस्ट यादरम्यान रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे.

गेल्या महिन्यात लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याच्या काही घटना घडल्या. त्यामुळे पुढील 8 दिवस रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रकात झालेले बदल लक्षात घेणे गरजेचे आहे.

रेल्वे वाहतुकीत काय झाला बदल?

कोयना, सह्याद्री रेल्वे गाडी पुण्यावरून सुटणार

पुणे मार्गे भुसावळ आणि नाशिकला जाणाऱ्या गाड्यांना फटका

Loading...

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस 8 दिवस बंद

पुणे-भुसावळ आणि पुणे-पनवेल गाडीही राहणार बंद

मुंबईहून सुटणाऱ्या कोयना एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाड्या मुंबईऐवजी पुण्याहून सुटणार

डेक्कन एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस रद्द

नांदेडला जाणारी गाडी मुंबई ऐवजी पुणे ते नांदेड अशी धावणार

VIDEO : आंध्रमध्ये नोकऱ्यात भूमिपुत्रांना आरक्षण? मनसेची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...