मुंबईचे पोलीस आयुक्तही CBI प्रमुख पदाच्या स्पर्धेत!

मुंबईचे पोलीस आयुक्तही CBI प्रमुख पदाच्या स्पर्धेत!

अलोक वर्मा यांचा राजीनामा आणि वादानंतर CBIची गेलेली पत पुन्हा मिळविण्याची मोठी जबाबदारी नव्या प्रमुखाला पार पाडावी लागणार आहे.

  • Share this:

मुंबई 24  जानेवारी : अलोक वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर CBI चे नवे प्रमुख कोण असतील याची प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय. निवड समितीची तातडीने बैठक बोलवावी अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली होती.  ही बैठक 24 जानेवारीला होणार असून त्यात नव्या प्रमुखांचं नाव जाहीर होणार आहे. त्यासाठी अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आहेत.


सीबीआयच्या प्रमुखांच्या निवडीसाठी सुप्रीम कोर्टाने एक खास पद्धत घालून दिली आहे. याबाबत 2004 मध्ये सुप्रीम कोर्टानं मार्गदर्शक तत्व आखून दिली आहेत. त्यानुसार तीन सदस्यांची निवड समिती असून त्यात पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याचा समावेश असतो. ही समिती सीबीआयच्या प्रमुखांना काढू शकते किंवा त्यांची नियुक्ती करू शकते. सीबीआयच्या प्रमुखांना दोन वर्षांचा कालवधी निश्चित केला आहे.


त्यासाठी केंद्राचं कार्मिक मंत्रालय गृहमंत्रालयाच्या मदतीने 10 ज्येष्ठ अधिकाऱ्यांची यादी तयार करत आहे. त्यात महासंचालक दर्जाच्या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांचा समावेश असतो. किंवा NSG आणि त्यासारख्या महत्त्वाच्या संस्थांच्या प्रमुखांचाही विचार होऊ शकतो.


या यादीतून छाननी होऊन अंतिम यादी तयार केली जाते. त्यात तीन किंवा चार नावांचा समावेश असतो. 1983, 1984 आणि 1985मधल्या IPS अधिकाऱ्यांचा यासाठी विचार करण्यात येत आहे. यात मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांचं नाव आघाडीवर आहे.


कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?


सुबोध कुमार जयस्वाल - जयस्वाल हे सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त असून 1985 च्या बॅचचे  अधिकारी आहेत. केंद्रात आणि रॉमध्येही त्यांनी काम केलंय. त्यामुळे त्यांची दावेदारी महत्त्वाची मानली जातेय.


सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.


त्यांनी RAW या  गुप्तचर संस्थेत 9 वर्ष महत्त्वाच्या पदावर काम केलंय.


त्यांना केंद्रातही सचिवपदावर काम करण्याचा अनुभव आहे.


2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात ते सहभागी होते.


मुंबई पोलीस खात्यात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.


हे आहेत अन्य अधिकारी...


ओ.पी. सिंग - सिंग सध्या उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक आहेत.


वाय. सी. मोदी,  NIA चे प्रमुख


सुदीप लखटकिया, National Security Guard (NSG)


रिना मित्रा, विशेष सचिव गृहमंत्रालय


राजीव राय भटनागर, CRPF महासंचालक


एस. जावेद अहमद, महासंचालक, नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायंस


रजनीकांत मिश्रा, महासंचालक, सीमा सुरक्षा दल


एस.एस. देसवाल, संचालक ITBP


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2019 07:13 PM IST

ताज्या बातम्या