राज्याच्या राजकारणात होणार मोठा भूकंप, राष्ट्रवादीचे 2 मोठे नेते करणार शिवसेना प्रवेश

या दोन मोठ्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रात सूपडा साफ झाला, असंच म्हणावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्का असेल.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 08:51 AM IST

राज्याच्या राजकारणात होणार मोठा भूकंप, राष्ट्रवादीचे 2 मोठे नेते करणार शिवसेना प्रवेश

उदय जाधव

मुंबई, 25 जुलै : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. या संदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मात्र सचिन अहिर शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यासाठी एका पायावर तयार असल्याचंही सांगण्यात येत आहे. शिवसेनेत घेतल्यावर त्यांना कोणता मतदारसंघ सोडायचा यावर एकमत होत नसल्यामुळे तुर्तास सचिन अहिर यांना थांबण्यास सांगण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र गुरुवारी (25 जुलै) दिवसभरात काहीही घडू शकतं अशीही शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात 'न्यूज 18 लोकमत'नं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन बंद होता.

भुजबळांची घरवापसी

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ ही घर वापसी करण्यासाठी तयार झाले आहेत.  त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांच्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत. स्वतः छगन भुजबळ राजकीय संन्यास घेण्याच्या मनस्थितीत असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळेच ते मुलगा पंकज भुजबळ याच्या भवितव्याची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ येत्या 27 जुलै रोजी म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र या सर्व राजकीय चर्चांना मातोश्रीने अजुनही हिरवा कंदिल दाखवलेला नाही. त्यामुळे नेमकं खरं काय हे मातोश्रीच ठरवणार एव्हढं नक्की.

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट होत आहे व्हायरल

Loading...

(पाहा : SPECIAL REPORT : भाजपच्याच मेळाव्यात महिला पदाधिकाऱ्याची छेडछाड, कुठे गेली शिस्त?)

छगन भुजबळ आणि सचिन अहिर शिवसेनेत जाणार?

1) वरळी विधानसभा

माजी आमदार आणि मंत्री

मात्रा आता याच मतदारसंघात शिवसेनेचे सुनिल शिंदे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना बदलण्यात येणार नाही.

2) भायखळा विधानसभा

सध्या MIM चे वारीस पठाण आमदार आहेत. याच मतदारसंघात शिवसेना उपनेते आणि बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव विधानसभेची तयारी करीत आहेत. त्यामुळे सचिन अहिर यांनी जर यशवंत जाधव यांच्याशी तह केला तर भायखळा विधानसभा मतदारसंघ सचिन अहिर यांच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.

3) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भायखळा विधानसभा मतदार संघातून सचिन अहिर यांनी निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे यशवंत जाधव तसेच अरुण गवळी कुटुंबांशी बोलणी करून स्व:तासाठी जागा निर्माण केली आहे.

(पाहा : VIDEO : अकबरुद्दीन ओवेसींचं RSS बद्दल वादग्रस्त विधान, म्हणाले...)

4) छगन भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेसनेच गेली काही वर्षे राजकीय कोंडी केली आहे. त्यामुळे भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यामातून आपलं बळ निर्माण केलं होतं.

5) महाराष्ट्र सदन निर्माण घोटाळ्यात तुरुंगवास झाल्यामुळे आपल्या डोक्यावर कुणाचाच हात नसल्याची जाणीव भुजबळांना झाली.

6) त्यामुळे आता शिवसेनेत घरवापसी हाच पर्याय त्यांना जवळचा वाटू लागला आहे.

7) छगन भुजबळ आणि सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रात सूपडा साफ झालाच समजा.

(पाहा :VIDEO : चंद्रकांत पाटलांमुळे भाजपचं पितळ उघडं, पाहा काय म्हणाले...)

SPECIAL REPORT : युतीची गाडी सुसाट अन् काँग्रेसचं वरातीमागून घोडं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 06:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...