लालबाग राजाच्या दरबारात कार्यकर्त्यांची मुजोरी,पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

भाविकांच्या समोरच घडलेल्या या प्रकारामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2018 05:04 PM IST

लालबाग राजाच्या दरबारात कार्यकर्त्यांची मुजोरी,पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

मुंबई, 28 सप्टेंबर : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या दरबारात पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची अरेरावी पाहण्यास मिळालीय. लालबाग राजाच्या कार्यकर्तांनी पोलीस अधिकाऱ्याशी बाचाबाची करून धक्काबुक्की केलीय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

लालबागचा राजाच्या मुख्य स्टेज समोर अतिमहत्वाच्या आणि ओळखीच्या व्यक्तींसाठी विशेष मार्ग तयार करण्यात आलीये. या मार्गातून अनेक सेलिब्रिटी आणि नेते मंडळी दर्शनासाठी येत असतात. याच मार्गातून झोन तीनचे उपायुक्त अभिनाश कुमार आले होते. त्यावेळी मूख दर्शन रांगेतील भाविकांच्या समोर झोन तीनचे उपायुक्त अभिनाश कुमार आणि राजाच्या कार्यकर्तेंची बाचाबाची झाली.

मंडळाचे खजीनदार मंगेश दळवी पलीकडच्या रांगेतून झोन तीनचे उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी वाद घालत होते. हा वाद इतका विकोपाला गेला की, अभिनाश कुमार यांनी रांगेच्या बॅरेकेटमधून बाहेर जात दळवी यांना पकडले आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्टेजवरील कार्यकर्ते मदतीला धावून आले

Loading...

भाविकांच्या समोरच घडलेल्या या प्रकारामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर घटनास्थळी मंडाळाचे मुख्य पदाधिकारी आणि वरीष्ठ पोलिसांची बैठक झाली. त्यानंतर झोन तीनचे उपायुक्त अभिनाश कुमार कोणतीही प्रतिक्रीया न देता निघून गेले.

याआधीही लालबागच्या राजाच्या दरबारात कार्यकर्त्यांची दादागिरी पाहण्यास मिळालीये.

================================================

VIDEO: तरुणीने भर रस्त्यात मित्रावर केले चाकूने वार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...