S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

राज्याचा 'पारा' घसरतोय; अहमदनगर सर्वात 'कूल'!

राज्याचा पारा आता हळूहळू घसरायला सुरुवात झाली आहे. मात्र यात मुंबईचा पारा काही खाली यायला तयार नसल्यानं थंडीला झालंय तरी काय असा प्रश्न आता मुंबईकरांना पडू लागला आहे.

Updated On: Nov 27, 2018 07:05 PM IST

राज्याचा 'पारा' घसरतोय; अहमदनगर सर्वात 'कूल'!

मुंबई, 27 नोव्हेंबर : राज्याचा पारा आता हळूहळू घसरायला सुरूवात झाली आहे. मात्र यात मुंबईचा पारा काही खाली यायला तयार नसल्यानं थंडीला झालंय तरी काय? असा प्रश्न आता मुंबईकरांना पडू लागला आहे. गेल्या 24 तासात अहमदनगर जिह्याचा पारा सर्वात खाली आल्याची नोंद पुणे वेधशाळेनं केली आहे. 10.2 अंशापर्यतं तो खाली आला. गेल्या 24 तासात नोंदविण्यात आलेल्या तापमानावरून मुंबई वगळता राज्यात थंडीची लाट पसरायाला सुरुवात झाली असल्याचं चित्र आहे. तर येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर आणखी वाढेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

यंदा पाऊस कमी पडला असला तरी, मुंबई वगळता संपूर्ण राज्यात थंडीचा जोर आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात सर्वात कमी तापनाची नोंद ही अहमदनगर जिल्ह्यात करण्यात आली. अहमदनगरचा पारा 10.2 अशापर्यंत खाली आला आहे. सर्वांना हवीहवीशी वाटणारी थंडी मात्र मुंबईतून जणू गायबच झाली आहे. कुलाब्यात 24 अंश सेल्सीयस, तर सांताक्रूझमध्ये 21.2 अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुण्याचा पारा 12.3 अंशावर स्थिरावलाय.

राज्याचं सर्वात थंड हवेचं ठिकाण म्हणजेच महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्र्वराचा पारा 15.2 अंशावर स्थिरावला होता. विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत गोवा आणि कोकणाचा पारा आणखी खाली उतरायला अजून चार-पाच दिवस तरी लागतील असं वेधशाळेनं म्हटलंय.


अहमदनगर खालोखाल नागपूर, गोंदिया आणि नाशिकच्या तापमानासुद्धा घट होताना दिसत आहे. नागपूरचा पारा हा 11, गोंदियाचा 11.4 आणि नाशिकचा पारा हा 11.2 अंशावर स्थिरावला होता. तर राज्यातील अन्य ठिकाणचा पार कशा पद्धतीनं घसरतोय हे पुढील माहितीवरून स्पष्ट होईल...


अलिबाग २०.४

रत्नागिरी १९.७

पणजी (गोवा) २१.३,

डहाणू २१.२

पुणे १२.३

अहमदनगर १०.२

जळगाव १४.२

कोल्हापूर १७.६

महाबळेश्वर १५.२

मालेगाव १३.८

नाशिक ११.२

सांगली १४.३

सातारा १४.१

सोलापूर १६.४

उस्मानाबाद १४.९

औरंगाबाद १२.७

परळी १३.०

नांदेड १५.०

अकोला १३.५

अमरावती १४.४

बुलढाणा १४.८

ब्रह्मपुरी १२.४

चंद्रपूर १४.८

गोंदिया ११.४

नागपुर ११.०

वर्धा १४.२

यवतमाळ १४.०


 सुप्रिया सुळेंची तलवारबाजी, व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल अचंबित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 06:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close