Elec-widget

...तर मग व्यावसायिकांच्या अन्नपदार्थांना बंदी का नाही? हायकोर्टाने मल्टिप्लेक्सना फटकारले

...तर मग व्यावसायिकांच्या अन्नपदार्थांना बंदी का नाही? हायकोर्टाने मल्टिप्लेक्सना फटकारले

जर लोकांना त्यांचे घरचे अन्नपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये आणू जाऊ दिले जात नाहीत तर मग व्यावसायिकांना अन्नपदार्थ विकण्याची परवानगी कशी दिली जाते ? असा सवालच विचाराला.

  • Share this:

04 एप्रिल:  मल्टिप्लेक्समध्ये अव्वा सव्वाच्या भावात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत  मुंबई हायकोर्टानं  नाराजी व्यक्त केली आहे.   जर लोकांना त्यांचे घरचे अन्नपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये आणू जाऊ दिले जात नाहीत तर मग व्यावसायिकांना अन्नपदार्थ विकण्याची परवानगी कशी दिली जाते ? असा सवालच विचाराला.

जैनेंद्र बक्षी यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये तिथले महागाडे अन्नपदार्थच विकत घ्यावे लागतात, घरगुती अन्नपदार्थांना मनाई असते असं याचिकेत म्हणण्यात आलं आहे. एखाद्या व्यक्तीला तब्येतीच्या कारणामुळे जर बाहेरचं अन्न चालणार नसेल तरीही त्याला घरचं अन्न मल्टीप्लेक्समधे नेता येत नसल्याचा आक्षेप याचिकेत नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्समध्ये घरगुती अन्नपदार्थ नेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान पनवेल इथल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये यावरुन वाद झाला होता असं मल्टिप्लेक्स संघटनेच्या वतीनं कोर्टाला सांगण्यात आलं. पण त्या मल्टिप्लेक्स मालकाला यावर न्यायालयात दाद मागता येईल, एका प्रसंगावरुन सरसकट मल्टिप्लेक्स मालकांची बाजू योग्य असं म्हणता येणार असंही कोर्टानं स्पष्ट केलं.

मल्टिप्लेक्सेसमध्ये अव्वाच्या सव्वा भावात खाद्यपदार्थ विकले जातात. पण लोकांना घरचे  पदार्थ आणण्यास मात्र मनाई केली जाते. थोडक्यात ग्राहकांची एकाप्रकारे लूट केली जाते.   .    १२ जूनपर्यंत याबद्दल धोरण ठरवा आणि तसं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने मल्टिप्लेक्सेसला दिले आहेत.

यानंतर तरी मल्टिपल्केसेसमधील लूट थांबते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2018 02:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...