मुंबई गोवा महामार्ग ठप्प, जगबुडीच्या पाण्याची पातळी 7 मिटरने वाढली

मुंबई गोवा महामार्ग ठप्प, जगबुडीच्या पाण्याची पातळी 7 मिटरने वाढली

पावसामुळे खराब झालेला रस्ता, हायवेचं सुरू असलेलं काम यामुळे हा महामार्ग जीवघेणा झालाय.

  • Share this:

खेड 10 जुलै :  कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस असल्याने सर्व नद्या नाले दुथडी भरून वाहू लागलेत. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. जगबुडी नदीच्या पुलावर पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. महामार्गाच्या दोनही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पाणी वाढल्याने जगबुडी खेड मधल्या नदीच्या पुलावरून वाहतूक थांबवण्यात आलीय. सात मीटर पर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. पर्यायी मार्ग नसल्याने मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय. पावसामुळे खराब झालेला रस्ता, हायवेचं सुरू असलेलं काम यामुळे हा रस्ता जीवघेणा झालाय.

त्यातच आता वाहतूक थांबविण्यात आल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. पाण्याच्या पातळीत घट झाल्यास आणि धोका नसल्याची खात्री झाल्यास पुन्हा वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने सांगितलंय.

World Cup: भारतीय संघासाठी मँचेस्टरमधून आली मोठी बातमी; असे असेल हवामान!

नितेश राणेंना अखेर जामीन मंजूर

इंजिनिअरला चिखलाने आंघोळ घातल्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला आहे. ओरोस न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यांच्यासह इतर 18 आरोपींनाही कोर्टाने जामीन मंजूर केलाय. मात्र कोर्टाने त्यांना काही अटीही घातल्या आहेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना दर रवीवारी कणकवली पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लावावी लागणार आहे.

हे आहे प्रकरण

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकला. तसेच शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी गडनदी पुलाला बांधून ठेवले होते.

VIDEO: 'दुष्काळात तेरावा महिना', मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा

या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना काल अटक करण्यात आली होती. नितेश राणे आणि त्यांच्या जवळपास 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(अ), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितेश राणेंसह सर्व आरोपींना दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने नितेश राणे यांच्यासह सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 09:02 PM IST

ताज्या बातम्या