उद्या मुंबई अंधारात बुडणार का? काय आहे तोडगा?

उद्या मुंबई अंधारात बुडणार का? काय आहे तोडगा?

मुंबईवरचं वीज संकट तात्पुरतं टळलं आहे. ऐन उन्हाळात वीज नसेल तर काय? या नुसत्या कल्पनेनेच मुंबई करांना घाम फुटला होता.

  • Share this:

मुंबई 20 मे : बेस्ट प्रशासनाने पैसे थकवल्याने 21 मेपासून टाटा पॉवर बेस्टला वीज देणार नाही अशी नोटीस कंपनीने बेस्टला दिली होती. त्यामुळे मुंबई अंधारात बुडणार का अशीही भीती व्यक्त केली जात होती. मात्र प्रशासनाने तातडीने हालचाली करत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुंबईवरचं वीज संकट तात्पुरतं टळलं आहे. ऐन उन्हाळात वीज नसेल तर काय? या नुसत्या कल्पनेनेच मुंबई करांना घाम फुटला होता.

पण थकलेल्या पैशाचा पहिला हप्ता देण्याची तयारी बेस्ट ने दाखविल्याने मुंबईकरांना दिलासा मिळालाय. बेस्टचे अधिकारी आणि आणि टाटा पॉवरचे सीएमडी यांच्यात झालेल्या चर्चेतून तोडगा काढण्यात आला. येत्या चार पाच दिवसात बेस्टच्या वतीनं १२८ कोटींच्या थकित रकमेतील पहिला हप्ता टाटा पॉवरला दिला जाणार आहे तर उर्वरित रक्कम ही टप्या टप्याने देणार असल्याची माहिती  बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिली माहिती. त्यामुळे मुंबई शहरातील वीज पुरवठा अबाधित राहाणार.

नेमकं काय आहे प्रकरण?

21मेपासून मुंबई शहर काळोखात जाणार असल्याचं बोललं जात होतं. कारण बेस्टनं टाटा पावरचे 561 कोटी रुपये थकवले. त्यामुळे टाटा पावरने बेस्टला नोटीस पाठवली आहे. थकवकेले 561 रुपये भरा नाहीतर 21 मेपासून वीज पुरवठा बंद करणार असं पाठवलेल्या नोटीसीमध्ये लिहण्यात आलं आहे. बेस्ट टाटा पावरकडून वीज खरेदी करून मुंबईत पुरवठा करते. पण बेस्टनं डिसेंबर 2018 जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 4 महिन्याचे पैसे थकवले आहेत. त्यामुळे टाटा पावरने करारातील तरतुदीनुसार बेस्टला नोटीस बजावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 06:14 PM IST

ताज्या बातम्या