News18 Lokmat

डबेवाल्‍यांना शाळांमध्‍ये डबे देण्‍यास परवानगी देण्‍याबाबत मुख्‍यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

मुंबईतील डबेवाल्‍यांना शाळांमध्‍ये सुरक्षेच्‍या कारणास्‍तव प्रवेश देण्‍यास शाळांनी बंदी घातली आहे. परंतु डबेवाल्‍यांची आजपर्यंतची प्रामाणिक सेवा व त्‍यांचे महत्त्‍व लक्षात घेता, ही बंदी अयोग्‍य असल्याचे मुंबई भाजपाध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 05:34 PM IST

डबेवाल्‍यांना शाळांमध्‍ये डबे देण्‍यास परवानगी देण्‍याबाबत मुख्‍यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, 21 मे- मुंबईतील डबेवाल्‍यांना शाळांमध्‍ये सुरक्षेच्‍या कारणास्‍तव प्रवेश देण्‍यास शाळांनी बंदी घातली आहे. परंतु डबेवाल्‍यांची आजपर्यंतची प्रामाणिक सेवा व त्‍यांचे महत्त्‍व लक्षात घेता, ही बंदी अयोग्‍य असल्याचे मुंबई भाजपाध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे. आशिष शेलार यांनी या मुद्द्यावर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. मुंबई पोलीस आयुक्‍तांनी तातडीने याबाबत संयुक्‍त बैठक घ्‍यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही याबाबत तातडीने लक्ष घालण्‍याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांना दिले आहे.

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता

'एकीकडे शाळांमध्ये जंक फूडवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. विद्यार्थ्यांना डबे पुरवण्यास शाळांनी मनाई केली आहे,' असा आरोप मुंबई डबेवाले संघटनेचे नेते सुभाष तळेकर आणि मेडगे यांनी केला आहे. त्‍याची दखल घेत मुंबई भाजपाध्‍यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारी तातडीने मुख्‍यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर उद्या मेगा ब्लॉक, या वेळेत बंद राहणार वाहतूक

'मुंबईतील डबेवाले हे त्‍यांच्‍या व्‍यवस्‍थापन कौशल्‍यासाठी जगप्रसिद्ध असून 1980 पासून मुंबईतील डबेवाले सुमारे रोज 2 लाख जणांना डबे पोहोचविण्‍याचे काम 365 दिवस अत्‍यंत मेहनतीने करीत असतात. ही सेवा हे डबेवाले अत्‍यंत प्रामाणिकपणे करीत आहेत. त्‍यामुळे त्‍यांना शाळेत डबे देण्‍यास बंदी घालणे, ही बाब अन्‍यायकारक आहे. शाळांनी मुलांच्‍या सुरक्षेची काळजी जरूर घ्‍यावी. मात्र शाळांमध्‍ये अन्‍य सेवा देणाऱ्यांना ज्‍या पद्धतीने परवानगी देण्‍यात येते. त्‍याच पद्धतीने डबेवाल्‍यांची सेवाही सुरू ठेवण्‍यात यावी', अशी मागणी करीत आमदार आशिष शेलार यांनी मुख्‍यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन ही बाब त्‍यांच्‍या निदर्शनास आणून दिली.

Loading...

गेवराई तालुक्यात तिहेरी अपघात.. पेटत्या कारमध्ये गरोदर महिलेचा होरपळून मृत्यू

दरम्‍यान, मुंबई पोलीस आयुक्‍तांनी तातडीने शाळा, डबेवाले यांच्‍याशी संयुक्‍त बैठक घेऊन यावर तोडगा काढावा, असे निर्देश या पत्रावर मुख्‍यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही शिक्षण उपसंचालकांनी याबाबत तातडीने लक्ष घालावे, तसेच ही सेवा सुरू राहिल, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश दिले आहेत.


भर चौकात तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार, CCTV व्हिडीओ समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 05:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...