मराठा आरक्षणांतर्गत भरलेल्या 'त्या' नियुक्त्यांना 11 महिन्यांची मुदतवाढ

मुदत ३ नोव्हेंबरला संपल्यामुळे राज्य सरकारनं केलेला अर्ज मान्य करत मुंबई हायकोर्टाने या नियुक्त्यांना ११ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2017 05:24 PM IST

मराठा आरक्षणांतर्गत भरलेल्या 'त्या' नियुक्त्यांना 11 महिन्यांची मुदतवाढ

08 नोव्हेंबर : मराठा समाज आरक्षणांतर्गत विविध सरकारी संस्थांमधील रिक्त पदांवर १६ टक्के जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात आल्या होत्या.  या निर्णयाला हायकोर्टाने 11 महिन्यांची मुदतवाढ दिलीये.

मराठा समाज आरक्षणांतर्गत विविध सरकारी संस्थांमधील रिक्त पदांवर १६ टक्के जागा या मुंबई हायकोर्टाच्या परवानगीने खुल्या प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात किंवा हंगामी तत्वावर भरण्यात आल्या होत्या. त्यांची मुदत ३ नोव्हेंबरला संपल्यामुळे राज्य सरकारनं केलेला अर्ज मान्य  करत  मुंबई हायकोर्टाने या नियुक्त्यांना ११ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

मुंबई हायकोर्टातील मराठा आरक्षणाची याचिका अजूनही प्रलंबित असल्याने या नियुक्त्यांना आणखी ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती सरकारने या अर्जात केली होती.

यापूर्वी हायकोर्टाच्या परवानगीने आधी ११ महिन्यांसाठी सरकारने या नियुक्त्या केल्या होत्या आणि नंतर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...