S M L

मुलायम सिंह नवीन पक्ष स्थापन करणार नाहीत

नवीन पक्ष स्थापन करणार नाही हे जरी त्यांनी सांगितलं असलं तरी आपल्या मुलावर मात्र त्यांनी टीका केली आहे. त्याला शुभेच्छा ही दिल्या आहेत पण त्याचवेळी मी त्याच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं मुलायम सिंहांनी स्पष्ट केलं आहे.जो मुलगा आपल्या वडिलांना दगा देतो तो आयुष्यात कधी यशस्वी होत नाही अशी टीका मुलायम सिंहांनी केली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 25, 2017 02:04 PM IST

मुलायम सिंह नवीन पक्ष स्थापन करणार नाहीत

लखनौ, 25 सप्टेंबर: मुलायम सिंह नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची सर्वत्र चर्चा होती. या चर्चेला त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिला आहे. आपण नवीन पक्ष स्थापन करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे

नवीन पक्ष स्थापन करणार नाही हे जरी त्यांनी सांगितलं असलं तरी आपल्या मुलावर मात्र त्यांनी टीका केली आहे. त्याला शुभेच्छा ही दिल्या आहेत पण त्याचवेळी मी त्याच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं मुलायम सिंहांनी स्पष्ट केलं आहे.जो मुलगा आपल्या वडिलांना दगा देतो तो आयुष्यात कधी यशस्वी होत नाही अशी टीका मुलायम सिंहांनी केली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या अगोदर समाजवादी पक्षात दोन गट पडले होतॆ. आता मुलायम सिंह नवीन पक्ष स्थापन करण्याची शक्यता सर्वत्र वर्तवली जात होती.

दरम्यान केंद्रातल्या मोदी सरकारवर मात्र मुलायम सिंह यांनी निशाणा साधला आहे. पेट्रोल डिझेलचे भाव जीएसटीमध्ये घ्यायला हवे असं मत त्यांनी व्यक्त केलं . सरकारचं जीएसटीविषयक धोरण आणि नोटाबंदीवर त्यांनी टीका केली. नोटाबंदीने देशाच्या जनतेचं कंबरड मोडलं आहे. वाढत्या महागाईबदद्ल ही त्यांनी रोष व्यक्त केला आहे. तसंच वाराणसी विद्यापीठात होत असलेल्या घटना तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी याबद्दलच्या सरकारी धोरणांवरही टीका केली आहे.आता मुलायम सिंहांच्या या निर्णयानंतर उत्तर प्रदेशचं राजकारण काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 01:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close