नितेश राणे यांनी राडा केलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

नितेश राणे यांनी राडा केलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

कुठल्याही परिस्थितीत रस्ता दुरुस्त करून घेणारच असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता.

  • Share this:

दिनेश केळुस्कर, रत्नागिरी 10 जुलै : आमदार नितेश राणे यांनी ज्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राडा केला होता तो रस्ता अखेर आता दुरुस्त होतोय. गेली काही दिवस झालेल्या वादामुळे ठेकेदाराला जाग आली आणि त्याने रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केलीय. योगायोगाने नितेश राणे यांना आजच कोर्टानं जामीनही मंजूर केलाय. कुठल्याही परिस्थितीत रस्ता दुरुस्त करून घेणारच असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता. नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता.

नितेश राणेंना जामीन मंजूर

इंजिनिअरला चिखलाने आंघोळ घातल्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला आहे. ओरोस न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यांच्यासह इतर 18 आरोपींनाही कोर्टाने जामीन मंजूर केलाय. मात्र कोर्टाने त्यांना काही अटीही घातल्या आहेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना दर रवीवारी कणकवली पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लावावी लागणार आहे.

मोदींवर विश्वास ठेवून लोकांनी निवडून दिलं, शिवसेनेच्या खासदाराचा VIDEO व्हायरल

काय आहे प्रकरण?

मुंबई – गोवा हायवेचं सध्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी देखील होत असून काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना देखील समोर आल्या. त्यानंतर गुरूवार 4 जुलै रोजी नितेश राणे यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना सर्विस रोड का नाही बांधला? गोव्यामध्ये सर्विस रोड होतो मग कणकवलीत का नाही? असा सवाल केला.

भाजप नगरसेवकाने महापालिकेच्या मुख्यालयासमोरच रिचवली कचऱ्याची गाडी

यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतून त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी नितेश राणे यांनी 15 दिवसांत समस्या सोडव अशी तंबी देखील अभियंता प्रकाश शेडेकर यांना दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2019 09:24 PM IST

ताज्या बातम्या