MTDCचा बेजबाबदारपणा, सडत आहेत 3 कोटींच्या बोटी

MTDCने एवढा बेजबादारपणा दाखविला की त्यांनी दुरुस्तीसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या बोटींशी नातच तोडून टाकलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 05:33 PM IST

MTDCचा बेजबाबदारपणा, सडत आहेत 3 कोटींच्या बोटी

शिवाजी गोरे, दापोली, 25 जून : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दोन बोटी 'कोयना' आणि 'पंचगंगा' दुरुस्तीअभावी अनुक्रमे दाभोळ आणि बाणकोट खाडी मध्ये उभ्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना फटका बसला असून शासनाचे तीन कोटी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे. याबाबत अनेकदा एमटीडीसी कार्यालयाला तक्रारी करण्यात आल्यात. मात्र  त्यांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही. नवी मुंबई येथे उभी असणारी पंचगंगा ही हाऊस बोट 9 मार्च 2017 रोजी एका टग च्या सहाय्याने एमटीडीसी ने बाणकोट खाडी मध्ये आणून सुवर्णदुर्ग शिपिंग आणि मरिन सर्व्हिसेस मध्ये दुरुस्तीला आणली. या कंपनीचे चंद्रकांत मोकल हे संचालक आहेत. MTDCच्या धरसोड वृत्तीमुळेच याचं काम पुढे जाऊ शकलं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

बेजबाबदार कारभार

मालवणला दोन वर्षे उभी असणारी कोयना नावाची हाऊस बोटही टग ला बांधूनच मालवण हुन दाभोळ खाडी मध्ये आणण्यात आली ही हाऊसबोट देखील एमटीडीसीकडून डॉक्टर मोकल यांच्या ताब्यात देण्यात आली. या दोन्हीही हाऊस बोटींचा सर्वे झालेला नाही तसेच त्यांचा विमा देखील उतरवलेला नाही अशीही माहितीही त्यांनी दिलीय. पर्यटकांसाठी सुविधा तर दूर, त्यांच्या सुरक्षेचा विचार केला गेलेला नाही हेही स्पष्ट झालं. ह्या दोन्ही बोटी  मोकल यांच्या ताब्यात देताना महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने कोणताही लेखी व्यवहार केलेला नाही. डॉक्टर मोकल यांनी हाऊस बोटीच्या कामाबाबत म्हणजेच बोटीचे इंजिन, जनरेटर इंजिन, पत्र्याचे काम, रंगरंगोटी इत्यादी कामाची यादी एमटीडीसीकडे देऊनही त्यांनी कोणतीच हालचाल केली नाही किंवा कोणताच प्रतिसादही दिला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

बेवारस बोटी

तरीही मोकल यांनी हाऊसबोटी ची होत असलेली वाईट अवस्था पाहून बोटीच्या निरनिराळ्या कामासाठी अंदाजे तीन लाख 63 हजार रुपये खर्च केले तसेच पंचगंगा या बोटीच्या विविध कामासाठी 3 लाख 60 हजार रुपये खर्च केले, तशी कल्पनाही मोकल यांनी एमटीडीसी कार्यालयाला दिली होती. मात्र एमटीडीसी कार्यालयातून कोणताच प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. शिवाय मोकल यांनी या दोन्ही बोटींची राखण ही केलेली आहे. पाच महिन्यांपूर्वी एमटीडीसी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन्ही बोटींना भेट दिली असता दोन्ही बोटींचे काम त्वरित केले नाही तर त्या फुकट जाणार याची कल्पना मोकल यांनी एमटीडीसी धिकार्‍यांना दिली होती. मात्र अद्यापही परिस्थितीत काही सुधारणा झालेली नाही.

Loading...

पर्यटनाला नुकसान

19 जानेवारी 2019 रोजी प्रादेशिक व्यवस्थापक रत्नागिरी यांचेबरोबर मोकल यांनी दाभोळ येथे सविस्तर चर्चा करून दोन्ही बोटी त्यांच्या ताब्यात दिलेल्या आहेत. मात्र डॉक्टर मोकल यांनी केलेल्या खर्चाच्या बाबतीत एमटीडीसी चे अधिकारी काही बोलावयास तयार नाहीत. त्यामुळे मोकल हे कोर्टाकडे धाव घेण्याची शक्यता आहे. यासंदर्भात MTDC च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तत्परता दाखवली असती तर रत्नागिरी मध्ये ठिकठिकाणी हाऊसबोट सुविधेचा उपभोग घेता आला असता, येथील पर्यटनाला अधिकची चालना मिळाली असती. मात्र मंडळाच्या निष्क्रिय अधिकार्यांमुळे हाऊसबोट सुविधा अद्यापतरी कागदावरच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 05:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...