एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर, 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांची वेतनवाढ

एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर, 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांची वेतनवाढ

कनिष्ठ वेतनश्रेणीत 500 रुपयांची वाढ लागू करण्यात येईल

  • Share this:

07 एप्रिल : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिलाय. एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्यात आलीये. या पगारवाढीचा एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

एसटी महामंडळाच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी हा 3 वर्षांहून अधिकचा करण्यात आला आहे.

कनिष्ठ वेतनश्रेणीत 500 रुपयांची वाढ लागू करण्यात येईल. पण ज्याने 1 वर्ष कनिष्ठ  वेतनश्रेणी मध्ये समाधानकारक काम केलं तर वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होणार आहे. तसंच ही पगारवाढ तातडीनं एक एप्रिलपासून लागू झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2017 08:00 PM IST

ताज्या बातम्या