News18 Lokmat

HSC result : बारावीचा निकाल जाहीर; News18 Lokmat वर थेट पाहा

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता दिसणार ऑनलाईन रिझल्ट. कसा आणि कुठे पाहायचा रिझल्ट?

News18 Lokmat | Updated On: May 28, 2019 06:20 PM IST

HSC result : बारावीचा निकाल जाहीर; News18 Lokmat वर थेट पाहा

मुंबई, 28 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ अर्थात महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर होणार आहे. बोर्डाच्या अध्यक्षांनी दुपारी 11 वाजता निकाल जाहीर केला. यंदाचा बारावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल.

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे निकाल तुम्ही News18 Lokmat या आमच्या वेबसाईटवर थेट बघू शकता. ऑनलाईन निकाल कसे बघायचे यासाठी स्क्रोल डाऊन करून खालचा परिच्छेद पाहा. गेल्या वर्षी 30 मे रोजी निकाल लागला होता. यंदा दोन दिवस अगोदर बारावीचा रिझल्ट विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहे. दुपारी ठीक 1 वाजता निकाल इथे खाली दिलेल्या लिंकवर पाहता येईल.

याशिवाय बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरही दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल दिसू शकेल. त्यासाठी HSC बोर्डाच्या mahresult.nic.in या बेवसाईटवर जाता येईल.


HSC Result : इथे चेक करा तुमचा निकाल फक्त एका क्लिकवर

Loading...


HSC Result 2019, Maharashtra Board: 12 वीच्या निकालानंतर गोंधळून जाऊ नका, असं निवडा तुमचं करिअर


बोर्डाचा अधिकृत निकाल news18lokmat.com या वेबसाईटवरही आम्ही देणार आहोत. यंदा सर्वाधिक निकाल बोर्डाच्या कोकण विभागाचा लागला. कोकणचा निकाल 93. 23  टक्के तर सर्वांत कमी 82.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला.

कसा पाहायचा निकाल?

विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्रावर म्हणजेच अॅडमिट कार्डवर असलेला त्यांचा रोल नंबर किंवा परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर हा निकाल पाहता येणार आहे. याशिवाय दिलेल्या फॉरमॅटमध्ये जन्मतारीखसुद्धा टाकावी लागणार आहे. हे दोन्ही रकाने भरल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. News18 Lokmat च्या वेबसाईटवर निकाला पाहण्यासाठी फक्त नाव, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी टाकावा लागणार आहे. तो टाकताच तुमचा निकाल पाहता येईल.तज्ज्ञ सांगतात, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही परीक्षा देऊन झालीय. पेपरमध्ये जे लिहिलंय, ते बदलता येणार नाही. दहावी, बारावीची परीक्षा हा एवढ्या मोठ्या आयुष्याचा भाग असतो. आयुष्य नव्हे. आयुष्य अनेक चांगल्या-वाईट घटनांनी घडत असतं. परीक्षेतले मार्क हे काही तुमचं अख्खं आयुष्य नाही.


रिझल्टच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आनंदात रहावं. आपण ज्यामुळे खूश होतो, त्या गोष्टी कराव्यात. आवडती गाणी ऐकणं, सिनेमा पाहणं, गेम्स खेळणं, मित्र-मैत्रिणींबरोबर मोकळ्या हवेत फिरायला जाणं या गोष्टी कराव्यात. आवडते पदार्थही खावेत. ज्यांना योग, मेडिटेशन करायची सवय आहे, तेही करावं.


संबंधित बातम्या


HSC RESULT LIVE : बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर, एका क्लिकवर जाणून घ्या


HSC RESULT : बारावी बोर्डाच्या परीक्षेत पुन्हा मुलींची बाजी; या विभागाचा निकाल सर्वांत कमी


HSC RESULT : दिव्यांग निष्काचं आभाळाएवढं यश, कहाणी ऐकूण तुम्हीही कराल सलाम!


HSC result : 'परश्या.... आर्ची पास झाली रे...', पाहा रिंकूचा निकाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2019 11:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...