लोकसभेत मिळालेल्या मतांच्याबरोबरीने वृक्ष लावणार, या खासदाराने केला संकल्प

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 07:13 PM IST

लोकसभेत मिळालेल्या मतांच्याबरोबरीने वृक्ष लावणार, या खासदाराने केला संकल्प

मुंबई, 5 जून- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी एक अनोखा संकल्प केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांना एकूण 4 लाख 24 हजार 913 मते मिळाली होती. मतांच्या या संख्येएवढी वृक्ष पुढील 5 वर्षांत लावण्याचे खासदार शेवाळे यांनी निर्णय घेतला आहे.

'प्लांट अ होप' (Plant a Hope)अशा नावाने पुढील पाच वर्षे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात मुंबईतील विविध सामाजिक संस्थांनाही सहभागी करून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी केली जाणार आहे. येत्या 10 जूनला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत या उपक्रमाची, खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते सुरुवात केली जाणार आहे. मुंबईतील विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या तसेच सामन्य नागरिक या सर्वांच्या माध्यमातून पाच वर्षांत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून मला मत देणाऱ्या प्रत्येक मतदाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी मला मिळालेल्या मतांइतक्या वृक्षांची लागवड करणार आहे. जागतिक हवामान बदलाच्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. 'प्लांट अ होप' या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी राहील, अशी आशा खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.


शौचालयाच्या टाईल्सवर महात्मा गांधींचा फोटो, VIDEO व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 07:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...