डोंबिवलीत सासूनेच केला जावयाचा गळा दाबून खून

डोंबिवलीत सासूनेच केला जावयाचा गळा दाबून खून

या प्रकरणी अनिताबाई वळदे (52) हिच्याविरूद्ध विष्णूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • Share this:

डोंबिवली,28जुलै : डोंबिवलीत एका सासूनेच आपल्या जावयाचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अनिताबाई वळदे (52) हिच्याविरूद्ध विष्णूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

रवी सोलंकी(25) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान विष्णूनगर पोलिसांनी आरोपी महिला आनिताबाई वळदेला अटकही केली आहे.हत्येचं कारण अजून तरी स्पष्ट झालेलं नसून या प्रकरणाचा अधिक तपास डोंबिवली पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 03:49 PM IST

ताज्या बातम्या