मुलीला मिळालं आईचं गर्भाशय!

सोलापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचं गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आलंय. ही 9 तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी देखील झालीये.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 19, 2017 12:51 PM IST

मुलीला मिळालं आईचं गर्भाशय!

19 मे : आई होणं ही प्रक्रिया नैसर्गिक आणि सुंदर आहे. कारण एक स्त्री 9 महिने आपल्या गर्भाशयात एक हाडा-मासाचा जीव वाढवत असते. आपण ज्या आईच्या गर्भाशयात वाढलो त्याच  गर्भाशयात जर आपली मुलं वाढली तर काय वाटेल?

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण, हो हे घडलंय पुण्यामध्ये.एका आईनं आपल्या मुलीला स्वतःचं गर्भाशय दिलंय आणि ही 9 तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी देखील झालीये.देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी यशस्वीरित्या पार पडली. सोलापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचं गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आलंय.

अत्यंत गुंतागुंतीची  मानली जाणारी ही शस्त्रक्रिया तब्बल ९ तास चालली होती. डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखालील १२ निष्णात डॉक्टरांच्या टीमनं हे प्रत्यारोपण यशस्वी पार पाडलं. ज्या स्त्रिया मुलं होण्यासाठी अनेक प्रयत्न करून थकल्या असतील त्यांच्यासाठी आता अजून एक आशेचा किरण उपलब्ध आआयवीएफ, टेस्ट-ट्युब-बेबी, सरोगसी, बाळ दत्तक घेणं या सगळ्याच्या जोडीला आता हा एक नवा ऑपशनचा मार्ग स्त्रियांसाठी खुला असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2017 12:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...