नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या माय-लेकींचा करुण अंत

या दोघी मायलेकी गुरे चरुन काल सायंकाळी घरी येत असताना या दोघीही पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीपात्रात वाहून गेल्या.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 07:11 PM IST

नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या माय-लेकींचा करुण अंत

किरण मोहिते 1 ऑगस्ट : साताऱ्यातील पाटण येथील नदी पात्रात आई आणि मुलगी वाहून गेल्या. वाहून गेलेल्या मायलोकींपैकी आईचा मृतदेह सापडला असून यातील लहान मुलीचा मृतदेह आद्याप सापडला नाही. हौसाबाई शिर्के आणि कोमल या दोघी मायलेकी गुरे चरुन काल सायंकाळी घरी येत असताना या दोघीही पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीपात्रात वाहून गेल्या. आज दिवसभर ट्रेकर्सनी या नदीपात्राचा परिसर शोधून काढला. महिलेचा मृतदेह मिळाला असून कोमलचा मृतदेह आद्याप मिळालेला नाही.

या नदीपात्राचे पाच किलोमिटर नंतर धबधब्यात रुपांतर होत असल्यामुळे मुलीचा मृतदेह आता धबधब्याच्या खालच्या बाजूला  शोधण्याशिवाय पर्याय नसल्याच मत ट्रेकर्सनी व्यक्त केल असून अंधार पडल्यानंतर हे शोधकार्य थांबवण्यात आलंय. आता शुक्रवारी  सकाळी पुन्हा ही ट्रेकर्समंडळी ही शोध मोहिम सुरु ठेवणार आहेत.

उपाशी मरण्यापेक्षा आत्मदहनाची परवानगी द्या, पैसे थकल्याने शेतकऱ्यांचा संताप

कार नदीत कोसळली

मावळ  : मावळ तालुक्यातील टाकवे गावात इंद्रायणी नदी पुलावरून जात असताना एक स्विफ्ट कार पुलाचा कठडा तोडून नदीत पडली. कार मधील एकाने पोहोत किनारा गाठत आपला जीव वाचवला तर दोघे जण कारमध्येच अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे सध्या इंद्रायणी नदीला भरपूर पाणी आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कार नेमकी कुठे आहे याचा पोलीस शोध घेताहेत.

Loading...

औरंगाबादेत वर्गमित्राचा तरुणीवर बलात्कार.. म्हणाला, अश्लील फोटो FB वर व्हायरल कर

निळ्या रंगाची स्विफ्ट कार कान्हे ते टाकवे रोडवर  इंद्रायणी नदीच्या पुलावरुन खाली नदी पात्रात पडली. भरधाव वेगाने ही कार येत होती. कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार नदीपात्रात कोसळली.

या कारमध्ये अक्षय संजय ढगे (20), संकेत नंदु असवले (20),  अक्षय मनोहर जगताप (20), असे तिघेजण होते. संकेत हा कार चालवत होता. यातल्या अक्षय हा कारमधून बाहेर पडला आणि पोहत किनाऱ्यावर आला. अजून दोन जण कारमध्ये अडकल्याची माहिती वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलीय. पोलिसांना मदतकार्यात शिवदुर्ग पथकही सहकार्य करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2019 07:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...