चंदू चव्हाणविरोधात कोर्ट मार्शल नाहीतर शिस्तभंगाची कारवाई झालीय- डॉ. सुभाष भामरे

चंदू चव्हाणविरोधात कोर्ट मार्शल नाहीतर शिस्तभंगाची कारवाई झालीय- डॉ. सुभाष भामरे

भारतीय सैन्य दलाचा जवान चंदू चव्हाण याच्यावर सैन्याने कोर्ट मार्शलची कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे.

  • Share this:

धुळे, 29 ऑक्टोबर : भारतीय सैन्य दलाचा जवान चंदू चव्हाण याच्यावर सैन्याने कोर्ट मार्शलची कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे. ते धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंदू चव्हाणवर भारतीय लष्कराने कोर्ट मार्शलची कारवाई केल्याबाबतचं वृत्त पूर्णतः चुकीचं आहे, चंदुवर झालेली कारवाई ही सैन्य दलाची फक्त खात्यांतर्गत शिष्टभंगाची कारवाई आहे असा खुलासा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केलाय. भारतीय लष्कराचा जवान चंदू चव्हाण याने नजरचुकीने पाकिस्तानची हद्द ओलांडताना तीन गंभीर चुका केल्याने त्याच्यावर ही दोन महिन्यांची शिस्तभंगाची कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलंय. जवान चंदू चव्हाणला कोणतीही तुरुंगवासाची (सिव्हिल जेल) शिक्षा होणार नाहीये.

विशेष म्हणजे चंदू चव्हाण यांची सैन्यातील नौकरी कायम राहणार असून लष्कराने चंदूला कमीत कमी शिक्षा ठोठावल्याचं ही संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी सांगितलं. गेल्यावर्षी भारतानं पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक दरम्यान अनावधानानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयानं दोषी ठरवत चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्याचं वृत्तं आलं होतं. यानंतर उलट सुलट चर्चाही सुरु झाल्या होत्या. पाकिस्तानातील तुरुंगातुन सुटून आल्यावर लष्कराने चंदूवर कारवाई केल्याबाबत चंदूचे आजोबा चिंधा पाटील यांनी प्रसारमाध्यमांकडे नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, चंदू चव्हाणवर फक्त शिष्टभंगाची कारवाई झाल्याचं संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी स्पष्ट केलंय.

पाकिस्तानात जाताना चंदू चव्हाणने लष्करी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई झालीय. त्यावर समाजातून टीका होऊ लागल्यावर संरक्षण राज्यमंत्र्यांनी हा खुलासा दिलाय. कारण चंदू चव्हाणला पाकिस्तानातून भारतात परत आणताना सरकारलाच अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मग त्याच चंदू चव्हाणवर लष्कर कारवाई कसं काय करू शकतं. असा सवाल चंदूच्या घरच्यांनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2017 10:42 AM IST

ताज्या बातम्या