आता मनसोक्त हापूस खा, मुंबईत तब्बल 1 लाख 27 हजार पेट्यांची आवक!

आता मनसोक्त हापूस खा, मुंबईत तब्बल 1 लाख 27 हजार पेट्यांची आवक!

सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभरात नवी मुंबईच्या वाशी कृषी उत्पन्न ​बाजार समितीच्या फळमार्केट यार्डमध्ये तब्बल 1 लाख 27 हजार इतक्या विक्रमी हापूस आंबा पेट्यांची आवक झालीय.

  • Share this:

मुंबई,ता.08 मे: सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभरात नवी मुंबईच्या वाशी कृषी उत्पन्न ​बाजार समितीच्या फळमार्केट यार्डमध्ये तब्बल 1 लाख 27 हजार इतक्या विक्रमी हापूस आंबा पेट्यांची आवक झालीय. एका दिवसातली आंब्याची ही आजवरची सर्वाधिक विक्रमी आवक आहे. आतापर्यंतच्या हंगामात हापूसची एका दिवसात 1 लाख

पेट्यांच्या आवकीचा रेकॉर्ड आहे. पण हा जुना रेकॉर्ड आजच्या 1 लाख 27 हजार पेट्यांनी मोडलाय. तशी माहिती आंबा व्यापारी बाळासाहेब बेंडे यांनी न्यूज18 लोकमतला दिलीय.

गेल्या 40 वर्षांच्या काळात एका दिवसात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबा मार्केटमध्ये दाखल झाल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळं हापूसचा दर आता 200 ते 500 रुपये डझन इतका झालाय. म्हणजे हापूस आता सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्यात आलाय.

पण या आवक वाढीचा फटका आंबा उत्पादकांना बसू लागलाय. पण येत्या काळात मुंबईकरांनी आंब्याच्या मुंबलक आवकीला प्रतिसाद देत आंब्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली तरच आंब्याचे दर स्थिर राहतील. त्याचा ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही फायदा होईल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2018 08:25 PM IST

ताज्या बातम्या