Elec-widget

'आणखीही काही जण भाजपमध्ये येणार, 10 - 15 नावं वेटिंग लिस्टमध्ये, गिरीश महाजन यांचा दावा

'आणखीही काही जण भाजपमध्ये येणार, 10 - 15 नावं वेटिंग लिस्टमध्ये, गिरीश महाजन यांचा दावा

सुजय विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याप्रमाणे आणखीही काही जण भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत. ही 10 ते 15 नावं वेटिंग लिस्टमध्ये आहेत, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 'News 18 लोकमत' ला सांगितलं.

  • Share this:

विवक कुलकर्णी

मुंबई, 12 मार्च : सुजय विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याप्रमाणे आणखीही काही जण भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत. ही 10 ते 15 नावं वेटिंग लिस्टमध्ये आहेत, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 'News 18 लोकमत' ला सांगितलं.

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि कमळाचा झेंडा हातात घेतला.

सुजय विखे पाटील यांच्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपमध्ये येणार का, असा प्रश्न विचारला जातोय. राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या विरोधी पक्षनेते आहेत. पण ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार का याबदद्ल मात्र त्यांनी नेमकी माहिती दिली नाही.

राज्यात आणि देशातही भाजपची ताकद वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींचंच सरकार येणार,असंही गिरीश महाजन म्हणाले.सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपला 45 जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही गिरीश महाजनांची भेट घेतली. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्यानंतर आता रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये रीतसर प्रवेश करतील,अशी चर्चा आहे.

मुंबईतले काँग्रेसचे आमदार कालिदास कोळमकर हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या बड्या नावांसह आणखी कोणकोण भाजपच्या गळाला लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांचा भाजपमधला प्रवेश ही दुर्देवी घटना आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुजय विखे पाटील यांचा प्रचार आपण करणार नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

===============================================================================================बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...