S M L

मुंबईत तुरळक, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता

पुढचे तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज

Updated On: Apr 15, 2019 07:27 AM IST

मुंबईत तुरळक, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता

मुंबई, 15 एप्रिल : जम्मू-काश्मीरकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर आणि मध्य भारतात 15 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. राजस्थानजवळील चक्रीय वात स्थितीमुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दोन्हीचा परिणाम म्हणून राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मुंबईतही तुरळक पावसाची शक्यता आहे.पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण, जोरदार अवकाळी पाऊस, गारा पडणे अशा घटना घडत आहेत. 13 आणि १४ एप्रिल रोजी अंबरनाथ, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, नाशिकमधील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली होती. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तर शेतकऱ्यांना मात्र जोरदार फटका बसला आहे. चिकू, आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. असाच अवकाळी पाऊस होत राहिला तर शेतकऱ्यांचा हातातोंडीशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार...

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात पावासाचा अंदाज


उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसांच्या सरी.

ढगांच्या गडगडाट, वादळी वाऱ्यासह मराठवाडा, विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज.

16 आणि 17 एप्रिल रोजी अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.

Loading...


वाचा अन्य बातम्या

News 18 Exclusive - 'नितीश कुमार डायनासोरसारखे, येत्या काही दिवसांत ते पक्षासहीत गायब होतील'

VIDEO- धक्कादायक! टोल नाक्यावर गाडी अडवल्यानं कर्मचाऱ्याला 8 किमी फरफटत नेलं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 07:15 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close