News18 Lokmat

'या' तारखेला मान्सून केरळमध्ये होणार दाखल, महाराष्ट्रात पाऊस लांबण्याची शक्यता

यंदा 93 टक्की पाऊस पडणार असल्याचंही स्कायमेटनं म्हटलं आहे. 22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 14, 2019 04:54 PM IST

'या' तारखेला मान्सून केरळमध्ये होणार दाखल, महाराष्ट्रात पाऊस लांबण्याची शक्यता

मुंबई, 14 मे : यंदाचा मान्सून महाराष्ट्रात उशीर दाखल होणार असल्याची माहिती स्कायमेटकडून देण्यात आली आहे. 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून लांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

यंदा 93 टक्की पाऊस पडणार असल्याचंही स्कायमेटनं म्हटलं आहे. 22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 4 जूनपर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी माहिती स्कायमेटचे शास्त्र्रज्ञ सुशांत पुराणिक यांनी दिली आहे.

सुशांत पुराणिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होणार असा अंदाज होता पण तो आता लांबणीवर जाणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. पण यंदा महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती बिकट राहिल अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा : बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमेवर हवाई दलाचा नवा 'मास्टर प्लान'

मान्सून हूल देणार की वेळेत येणार?

Loading...

काही दिवसांपूर्वी स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात मान्सून सरासरीच्या 93 टक्के पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचं म्हटलं होतं. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं.

हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार, 'अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो.' यंदा सरासरीच्या 95 ते 104 टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.

मान्सून चांगला झाला तर त्याचा परिणाम कोणत्या गोष्टींवर होणार?

1.आर्थिक विकास चांगला होईल

2.शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

3.अनेक ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

4.चांगला पाऊस झाला तर उत्पादन चांगलं येईल आणि शेतकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना फायदा होईल.

5. महामाई कमी होण्याची शक्यता

6. शेअर बाजारावर होऊ शकतो परिणाम

7. पाऊस चांगला झाला तर त्याचा फायदा बँक आणि फायनान्शियल सेक्टरलाही होणार आहे.

8.शेतकऱ्यांना आवश्यक ती उपकरण, वस्तू, खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे स्कायमेट आणि आयएमडी या दोन्हीचे अंदाज अगदी वेगवेगळे आहेत. दरम्यान, उन्हाचे आणि पाणी टंचाईचे चटके बसलेला शेतकरी आणि जनता पावसाची आतूरतेनं वाट पाहत आहे.


VIDEO : EVM बद्दल पवार कुटुंबीयांच्या मनात चाललंय काय? अजितदादा असं का बोलले?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2019 04:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...