येत्या ४८ तासात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

राज्यात कमालीचा उकाडाही जाणवत आहे. पण दिलासा देणारी गोष्ट म्हणजे मान्सूनची वेगवान वाटचाल सुरू असून कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2018 09:21 AM IST

येत्या ४८ तासात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

01 जून : येत्या ४८ तासात दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात कमालीचा उकाडाही जाणवत आहे. पण दिलासा देणारी गोष्ट म्हणजे मान्सूनची वेगवान वाटचाल सुरू असून कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे.

आज गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडलाय. दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागारात निर्माण झाल्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे.

मुंबईतही वातावरण पावसाळी आहे. सकाळी थोडा पाऊस शिंतडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2018 09:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...