मान्सूनआधी चक्रीवादळ धडकणार, पुढच्या 48 तासांत मुसळधार पावसामुळे 'या' गावांना धोका

अरबी समुद्रात कमी दबावाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये गुजरातच्या किनारपट्टीवरील अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 07:57 PM IST

मान्सूनआधी चक्रीवादळ धडकणार, पुढच्या 48 तासांत मुसळधार पावसामुळे 'या' गावांना धोका

मुंबई, 10 जून : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या 48 तासात रायगड, कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड जिल्हा प्रशासन व आपत्ती प्रशासनाने किनारपट्टीच्या गावांना आणि अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मच्छीमारी नौकानांही समुद्रात जाण्यास बंदी घातली आहे.

अरबी समुद्रात कमी दबावाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये गुजरातच्या किनारपट्टीवरील अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या अनेक शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात कमी दबावाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मासेमारांना पुढचे काही दिवस समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जूनला अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात काल पडलेला पाऊस हा वळवाचा पाऊस होता. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृष्य परीस्थिती निर्माण होत आहे.

हेही वाचा : अमित शहांबरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राबद्दल नेमकं काय घडल? वाचा INSIDE STORY

'वायू' असं या चक्रीवादळाचं नाव आहे. या वादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोणताही धोका नसला तरी त्यामुळे कोकणात चांगला पाऊस पडेल असा अंदाज मुंबई हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवस समुद्रात मासेमारांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात पडलेला पाऊस हा अतिउष्णतेमुळे पडलेला वळवाचा पाऊस आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृष्य परीस्थिती निर्माण होत आहे. या चक्रीवादळाला 'वायू' हे नाव देण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर जात गुजरात सौराष्ट्रच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह कोकण भागात  चांगला पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला अती सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही अरबी समुद्रात जाऊ नये अशा सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी अवकाळी आलेल्या पावसाने शेतीचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं. तर जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.


SPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2019 07:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close