S M L

महाराष्ट्रात 7 जूनपर्यंत मान्सून दाखल

राज्यात आज सगळीकडे मान्सूनपूर्व सरीं कोसळल्या. कोकणात रत्नागिरी सिधुदूर्गात मान्सूनपूर्व पावासाला सुरूवात झालीय.

Sachin Salve | Updated On: May 31, 2017 07:58 PM IST

महाराष्ट्रात 7 जूनपर्यंत मान्सून दाखल

31 मे : केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी  महाराष्ट्रात 7 जूनला दाखल होणार असल्याचं हवामान खात्यानं भाकित वर्तवलंय.

राज्यात आज सगळीकडे मान्सूनपूर्व सरीं कोसळल्या. कोकणात रत्नागिरी सिधुदूर्गात मान्सूनपूर्व पावासाला सुरूवात झालीय. दोन्ही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय. कोल्हापूर, सांगलीमध्येही रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामात बळीराजाची कमालीची धांदल उडाली.

यवतमाळ जिल्हात मारेगाव,करंजी, झरी,पांढरकवडा या परिसरातही पाऊसाने जोरदार हजेरी लावली. सुसाट वाऱ्यासह आलेल्या या पाऊसांने काही घरांवरील छपरं उडाली. या पाऊसाचा फटका तेंदू पत्ता व्यापाऱ्यांसह मजुरांनाही मोठ्या प्रमाणात बसला. मजुरांनी जंगलातून आणलेला तेंदू पत्ता सुकण्यासाठी उन्हात ठेवला होता. मात्र काल आलेल्या पाऊसाने तो पूर्णपणे भिजून गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 07:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close