7 जुलैपर्यंत या भागांत होऊ शकतो मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेले 3 दिवस जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. त्यामुळे 7 जुलैपर्यंत देशातल्या अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 03:53 PM IST

7 जुलैपर्यंत या भागांत होऊ शकतो मुसळधार पाऊस

नवी दिल्ली, 3 जुलै : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेले 3 दिवस जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. त्यामुळे 7 जुलैपर्यंत देशातल्या अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पुढच्या 24 तासांत मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामानाची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे आणि त्यामुळे मान्सून वेगाने पुढे जाऊ शकतो. राजधानी दिल्लीमध्ये मात्र अजूनही उष्णतेच्या झळा कायम आहेत. इथे सगळेजण पावसाची वाट पाहत आहेत.

मागच्या 24 तासांत पावसाच्या सामान्य टक्केवारीपेक्षा 11 टक्के जास्त पाऊस पडला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो, असाही हवामान विभागाचा अंदाज आहे.

मुंबईमध्ये पावसाचा अलर्ट

मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 2005 नंतर मुंबईत 24 तासात एवढा मुसळधार पाऊस पडला आहे. आजही काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

Loading...

उत्तराखंड, छत्तीसगड, दक्षिण गुजरात, कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तेलंगणा या राज्यांत जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चांद्रयान - 2 : तुम्हालाही प्रत्यक्ष पाहता येणार लाँचिंग, नोंदणी आजपासून

4 जुलै : पश्चिमी मध्य प्रदेश, कोकण, गोवा इथे जोरदार पाऊस होऊ शकतो.

5 जुलै : कोकण, गोवा, केरळ, कर्नाटकची किनारपट्टी आणि ईशान्य भारतात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

6 जुलै : भारताच्या अनेक राज्यांत चांगला पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

7 जुलै : कोकण, गोवा, कर्नाटकची किनारपट्टी या भागांसोबतच ईशान्य भारत, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांतही चांगला पाऊस होऊ शकतो.

==================================================================================================

VIDEO: मध्य रेल्वेचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: monsoon
First Published: Jul 3, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...