औरंगाबादमध्ये चक्क झाडाला लागले पैसे!

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2017 12:12 PM IST

औरंगाबादमध्ये चक्क झाडाला लागले पैसे!

कोणी उधळपट्टी करणारा भेटला तर 'पैसे झाडाला लागलेत का रे?', असं सहज विचारत आपण त्या व्यक्तीची अनेकदा फिरकी घेतली असेल. मात्र, प्रत्यक्षात झाडाला पैसे लागलेत असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना... अहो... पण औरंगाबादकरांना खरोखरच याचा अनुभव आला आहे.

औरंगाबादमधल्या एन-2 परिसरात एका झाडाला पैसे लटकल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र त्या नोटा काढण्याचं धाडस कुणीच केलं नाही. कारण त्या 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा होत्या.

एका अज्ञातानं मैदानामधल्या झाडांवर जुन्या नोटांचे बंडल फेकले. त्यातल्या काही नोटा झाडांवरच लटकत होत्या. झाडाला लटकलेल्या नोटा पाहण्यासाठी मात्र परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, फेकण्यात आलेली रक्कम साडे दहा लाखाच्या घरात होती अशी माहिती मिळते. पोलिसांनी या सर्व नोटा ताब्यात घेतला असून नोटा फेकणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...