दलित महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लगट करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

दलित महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लगट करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

दलित महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांत विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 18 जुलै- दलित महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांत विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बेलवंडी येथे ही घटना घडली आहे. दादा गोलांडे असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, बेलवंडी येथे 15 जुलैला जमिनीच्या वादातून एका दलित महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली. एवढेच नाही तर आरोपी दादा गोलांडे याच्यासह त्याच्या साथिदारांनी पीडितेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. लज्जा निर्माण होईल, असे वर्तन पीडित महिलेशी करण्यात आले. आरोपी दादा गोलांडे याने पीडितेसह तिच्या कुटूंबीयांनी दमदाटी करून त्यांना जातीवाचक शिविगाळही केली. पीडित महिलेसह तिचे कुटूंब मोलमजुरी व शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. परंतु, ही शेती हडपण्याचा दादा गोलांडे याचा इरादा आहे. 16 जुलैला आरोपींनी पीडित महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली होती. पतीचे हातपाय बांधून पिकअपमध्ये टाकून मारहान करत बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांसमोरही मारहाण केली. या प्रकरणी आरोपी दादा गोलांडे, गोरख गोलांडे, राजू गोलांडे, भाऊसाहेब गोलांडे याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

किरकोळ वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

परभणी जिल्ह्यातील पालम शहरात दोन गटांत किरकोळ वादातून हाणामारी झाली. नंतर जाळपोळही करण्यात आली. शहरातील काही भागांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास, शहरातील मुख्य चौकांमध्ये, दोन गट समोरासमोर आले. किरकोळ वादातून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचं रुपांतर पुढे हाणामारी-जाळपोळीत झालं. काही युवकांनी दगडफेकही केली. त्यानंतर शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्यात आली. प्रकार वाढत जाऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या, काही दुचाकीनही या जमावानं लक्ष केले. या घटनेमध्ये रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या, जवळपास दोन ते तीन मोटरसायकल पेटवून देण्यात आल्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक पालम शहरामध्ये मागवण्यात आल्या असून सध्या परिस्थिती तणावपूर्ण शांतता आहे.

VIDEO: लष्करी अळीमुळे बळीराजा हवालदिल; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2019 09:23 PM IST

ताज्या बातम्या