विधवेचा विनयभंग, कडक कारवाईच्या मागणीसाठी पुकालेल्या गाव बंदला हिंसक वळण

वाळू माफिया म्हणून ओळखला जाणारा तडीपार गुंड स्वप्नील निकम याने गावात येऊन विधवेचा विनयभंग केला होती. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 03:01 PM IST

विधवेचा विनयभंग, कडक कारवाईच्या मागणीसाठी पुकालेल्या गाव बंदला हिंसक वळण

बब्बू शेख (प्रतिनिधी)-

मनमाड, २२ एप्रिल-  देवळा तालुक्यातील लोहणेर येथे एका विधवा महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर कडक कारवाई करणयात यावी, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या गाव बंदला हिंसक वळण लागले. संतप्त गावकऱ्यांमध्ये गावात जाळपोळ केली. लोहणेर येथे सध्या तणाव पसरला आहे.

वाळू माफिया म्हणून ओळखला जाणारा तडीपार गुंड स्वप्नील निकम याने गावात येऊन विधवेचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. नराधमावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज गाव बंदची हाक देण्यात आली आहे. संतप्त गावकऱ्यांनी विनयभंग करणाऱ्या निकमच्या ऑफिसची मोडतोड करुन पेटवून दिले. या घटनेनंतर गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 02:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...