'तू मुझे अच्छी लगती है' असं म्हणत विनयभंग, तरुणीची धावत्या रिक्षातून उडी

'तू मुझे अच्छी लगती है' असं म्हणत एका रिक्षाचालकानं तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2019 12:07 PM IST

'तू मुझे अच्छी लगती है' असं म्हणत विनयभंग, तरुणीची धावत्या रिक्षातून उडी

प्रशांत बाग, (प्रतिनिधी)

नाशिक, 20 जून- 'तू मुझे अच्छी लगती है' असं म्हणत एका रिक्षाचालकानं तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षाचालकानं केलेले वर्तन पाहून घाबरलेल्या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी रिक्षातून जात होती. रिक्षाचालकाने 'तू मुझे अच्छी लगती है' असं म्हणत तिचा विनयभंग केला. तिने चालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले तरी त्याने रिक्षा थांबवला नाही. घाबरलेल्या तरुणीने थेट धावत्या रिक्षातून उडी मारली. तरुणीने रस्त्यावर पडल्याने ती जखमी झाली आहे. रवी गोफणे (वय-22) असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरुद्ध इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (19 जून) ही दुपारी 3 वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बँकेसमोर ही घटना घडली.

लज्जास्पद..श्रीवर्धनमध्ये विदेशी महिलेचा विनयभंग

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये विदेशी महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात समोर आली होती. विनयभंग करणारे दोघे म्हसळ्यातील असून त्यांना अटक करण्यात आली होती. आरोपींमध्ये एका अल्पवयीन तरूणाचा समावेश आहे. रफिश दफेदार आणि मोहम्मद कैफ अशी आरोपींची नावे आहेत.

Loading...

रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर एक लज्जास्पद घटना घडली. श्रीवर्धन येथे आलेल्या एका विदेशी पर्यटक महिलेचा दोन तरुणांनी विनयभंग केला. ही दुर्दैवी घटना श्रीवर्धनमधील नारायण पाखाडी परिसरात घडली. या विदेशी महिलेने तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोन्ही आरोपींना श्रीवर्धन पोलिसांनी अटक केली.


VIDEO: रांगेत उभं राहण्यावरून वाद; तरुणांकडून GRP पोलिसाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2019 12:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...