मंत्रालयातील महिला अधिकारीचा विनयभंग, फॉलो करत होता प्रोफाइल

मंत्रालयातील एका उच्चपदस्थ महिला अधिकारीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 10:32 PM IST

मंत्रालयातील महिला अधिकारीचा विनयभंग, फॉलो करत होता प्रोफाइल

मुंबई, 27 जून- मंत्रालयातील एका उच्चपदस्थ महिला अधिकारीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपी सोशल मीडियावरून पीडित महिलेचा छळ करत होता. सायबर पोलिसांनी पुण्यातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शरीफ गफार खान असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, आरोपी शरीफ गफार खान हा गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रालयातील महिला अधिकारीच्या सोशल मीडियावरील प्रोफाइल फॉलो करत होता. आरोपीने अनेकदा महिला अधिकारीचा विनयभंगही केला. याबाबत या महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाचा तपास केला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सायबर पोलिसांनी शरीफला पुण्यातून अटक केली. मुंबई येथील कोर्टात आरोपीला हजर केले असता कोर्टाने त्याला 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Eng vs Aus सामन्यावर सट्टा लावणाऱ्या PSI च्या हातात बेड्या

विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय) रंगेहात अटक करण्यात आली आहे. दादर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ज्ञानेश्वर खरमाटे असे आरोपी पीएसआयचे नाव असून त्याच्यासह दोघांना पोलिसांनी दादरमधील एका हॉटेलमधून अटक केली आहे.

ज्ञानेश्वर खरमाटे हा भायखळा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. या कारवाईनंतर त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या विश्वचषक सुरु असल्यामुळे प्रत्येक सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे.

Loading...

मिकीन शहा नावाचा व्यक्ती इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर फोनवरुन बेटिंग लावत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस पथकाने दादरमधील एका हॉटेलवर धाड टाकली. यात दोन जण सट्टा खेळताना आढळून आले. या कारवाईत क्रिकेट बुकी मिकीन शाह आणि त्याचे दोन साथीदार मनीष सिंग आणि प्रकाश बनकर हे सट्टा लावत होते. यावेळी पीएसआय ज्ञानेश्वर खरमाटे हा देखील तिथेच होता. मिकीन शहा आणि दोन आरोपींसहित ज्ञानेश्वर खारमाटे याला अटक करण्यात आली. आरोपींकडून 1 लाख 93 हजार 200 रुपये रोख आणि सहा मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता सगळ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

VIDEO: अमानुषतेचा कळस! अर्धनग्न करत तरुणाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 10:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...