लज्जास्पद..श्रीवर्धनमध्ये विदेशी महिलेचा विनयभंग, अल्पवयीन तरूणासह दोघांना अटक

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये विदेशी महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विनयभंग करणारे दोघे म्हसळ्यातील असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2019 12:22 PM IST

लज्जास्पद..श्रीवर्धनमध्ये विदेशी महिलेचा विनयभंग, अल्पवयीन तरूणासह दोघांना अटक

रायगड, 8 जून- जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये विदेशी महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विनयभंग करणारे दोघे म्हसळ्यातील असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन तरूणाचा समावेश आहे. रफिश दफेदार आणि मोहम्मद कैफ अशी आरोपींची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर एक लज्जास्पद घटना घडली आहे. श्रीवर्धन येथे आलेल्या एका विदेशी पर्यटक महिलेचा दोन तरुणांनी विनयभंग केला आहे. ही दुर्दैवी घटना श्रीवर्धनमधील नारायण पाखाडी परिसरात घडली. या विदेशी महिलेने तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोन्ही आरोपींना श्रीवर्धन पोलिसांनी अटक कली आहे. पैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. या प्रकरणी सदर परदेशी महिलेचा पत्ता पुण्याचा नोंदवल्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Maharashtra SSC Board Result 2019: दहावीचा निकाल जाहीर, दुपारी 1 वाजता ऑनलाइन पाहता येणार mahresult.nic.in

श्रीवर्धनमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक महिलेचा विनयभंग केल्याची घटना 6 जून संध्याकाळी घडली होती. चिली येथील दोन पर्यटक महिला श्रीवर्धनमध्ये येथे आल्या होत्या. नारायण पाखाडीमधून त्यांच्या हॉटेलजवळ जात असताना आरोपी रफिश दफेदार आणि मोहम्मद कैफ या दोघांनी एका महिलेशी असभ्य वर्तन केले. एवढेच नाही तर त्यांना शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न करत त्यांचा विनयभंग केला आहे.

VIDEO: मान्सून पूर्व पावसाचं थैमान, अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावलं

Loading...

पोलिसांनी परदेशी महिलेला केले पुणेकर..

विनयभंग झालेली पीडित महिला ही चिली देशाची नागरिक आहे. मात्र, श्रीवर्धन पोलिसांनी तिचा पत्ता पुणे असा नोंदविला आहे. यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.


बछड्याचा वाद; खैरे विरुद्ध इम्तीयाज जलील वादाची नवी ठिणगी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 12:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...