अश्लील इशारे करून पुण्यात भाजप नगरसेविकेचा विनयभंग

भाजप महिला नगरसेविकेला अश्लील इशारे करून एकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 09:09 PM IST

अश्लील इशारे करून पुण्यात भाजप नगरसेविकेचा विनयभंग

पुणे, 13 जुलै- भाजप महिला नगरसेविकेला अश्लील इशारे करून एकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर नगरसेविकेला जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक काळे असे आरोपीचे नाव आहे. निगडीतील भक्ती शक्ती चौकात शुक्रवारी घडला आहे.

काय आहे हे प्रकरण?

मिळालेली माहिती अशी की, पीडित नगरसेविका आणि त्यांचे पती हे भक्ती शक्ती चौकातून गाडीन जात होते. तितक्यात आरोपी अशोक काळे याने फॉर्च्युनर गाडीने नगरसेविकेच्या गाडीला कट मारला. तसेच समोर नेऊन नगरसेविकेच्या गाडीला फॉर्च्युनर आडवी लावली. नगरसेविकेच्या हाताला धरून खाली खेचले. 'तू माझ्या मालकाची तक्रार पोलिसांत का दिली,' असा जाब विचारत नगरसेविकेच्या कानशिलात लगावली. अश्लील इशारे केले. तसेच नगरसेविकेच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी आरोपी अशोक काळेसोबत आणखी एक जण होता. दरम्यान, निगडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

पुणे विद्यापीठात कमवा व शिका योजनेतील पैशावर माजी विद्यार्थ्यांचा डल्ला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गरीब विद्यार्थ्यांच्या कमवा व शिका योजनेतील पैशावर माजी विद्यार्थ्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कमवा व शिका योजनेत 3 लाख 46 हजार रुपयांचा अपहार झाला आहे.

Loading...

चौदाशे ते सोळाशे बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने हे पैसे काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे.

यासंदर्भात विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी विद्यापीठाच्या तीन माजी विद्यार्थ्यांच्या विरोधात चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोर भानुदास मगर ( रा. मारवाड, ता. माळशिरस), सागर तानाजी काळे (रा. पळसदेव, ता. इंदापूर) आणि किरण गायकवाड (रा.मुढाळे, ता. बारामती) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO : पालकांनो, बाळांकडे लक्ष द्या! चिमुरड्याने गिळले नाणे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2019 08:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...