मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला वरोऱ्याजवळ अपघात, सुरक्षाजवान जखमी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ताफ्यातील पहिल्या वाहनाला अपघात झाला. वाहन पलटी होऊन सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 16, 2019 07:39 PM IST

मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला वरोऱ्याजवळ अपघात, सुरक्षाजवान जखमी

नागपूर, 16 मे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ताफ्यातील पहिल्या वाहनाला अपघात झाला. वाहन पलटी होऊन सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. चंद्रपुरमधील वरोऱ्यातील नांदुरी गावाजवळ एका गाईला धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. मात्र, गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मोहन भागवत सुखरूप आहेत.

जखमी जवानाला उपचारासाठी वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तोपर्यंत मोहन भागवत स्वतः तिथे थांबले होते. यादरम्यान मोहन भागवत यांना सुखरूप नागपूरला पोहोचवण्यात आले आहे. ताफ्यातील इतर गाड्या सुखरूप नागपूरला रवाना करण्यात आले. घटनास्थळी वरोरा पोलिसांनी तत्परता दाखवत पूलाखाली असलेली स्कार्पिओ गाडीला बाहेर काढली.

दरम्यान, आजचा दिवस हा अपघातवार ठरलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण दिवसभरात झालेल्या सहा रस्ते अपघातांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.

औरंगाबाद, वर्धा, नंदूरबार, अमरावती, गोंदिया आणि येवला या भागात वेगवेगळ्या ठिकाणी हे भीषण अपघात झाले आहेत. औरंगाबादमध्ये मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झालाय. तर अशाच प्रकारे अपघात होऊन गोंदियात एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागलाय. वर्ध्यामध्ये भरधाव कारनं दोघांना चिरडल्याचा प्रकार घडलाय तर येवल्यामध्ये कंटेनर आणि कारची धडक होऊन एकाचा मृत्यू झालाय.

पैठण-औरंगाबाद रोडवरील धनगाव फाट्यालगत दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. संतोष लाटे (रा, जळगाव), रामेश्वर भाऊसाहेब सोनवणे (रा. वाहेगाव, ता.पैठण) अशी मृतांची नावे आहेत. धडक समोरासमोर झाल्याने दोन्ही मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वर्ध्यामध्ये भरधाव कारनं दुचाकी चालकानं चिरडल्याचा प्रकार घडलाय. पेट्रोल भरायला जाताना कारने धडक दिल्यामुळे हा अपघात झालाय. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय. दरम्यान अपघातानंतर पोबारा केलेल्या कारचालक आणि साथीदाराचा शोध घेतला जातोय. कार कारंजाकडून-अमरावतीकडे जात होती. दुचाकीचालक प्रवीण मानापुरे, रोशन बारइ याचा जागीच मृत्यू झाला. कारंजा घाडगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

नंदुरबारमध्ये एनबीसी मॉल जवळच्या कल्याणेश्वर मंदिराजवळ 4 वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 7 जण जखमी झाले. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने अपघातातल्या स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड केली. कारण याच गाडीमुळे अपघात झाला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर बर्निंग कारचा थरार, लाखो रुपयांची मर्सिडीज जळून खाक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2019 07:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close