गोरक्षेच्या नावावर हिंसा अमान्य-मोहन भागवत

गोरक्षेच्या नावावर हिंसा अमान्य-मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रदीर्घ भाषण केलं. यावेळी लालकृष्ण अडवाणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

  • Share this:

नागपूर,30 सप्टेंबर:गोरक्षेच्या नावावर हिंसा अमान्य असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवकाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रदीर्घ भाषण केलं. यावेळी लालकृष्ण अडवाणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

या भाषणादरम्यान ते मुंबईत झालेल्या चेंगराचेंगरी विषयी बोलले. याच विषयाने त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. चेंगराचेंगरीतील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर अनेक राजकीय मुद्द्यांवर त्यांनी त्यांची मत मांडली.

गोरक्षेचा मुद्दा धर्मापलीकडे जातो!

गोरक्षेचा मुद्दा हा धर्मांपलीकडे जाणारा आहे असंही ते यावेळी म्हणाले.तसंच अनेक मुस्लिम गोमांस खात नसल्याच त्यांनी सांगितलं. गोहत्याबंदीचं त्यांनी समर्थन केलं. पण त्याचवेळी गोरक्षेच्या नावावर होणाऱ्या हिंसेचा त्यांनी विरोध केला आहे.

यासोबतच त्यांनी सध्याच्या अनेक मुद्द्यांनी स्पर्श केला आहे.

रोहिंग्या निर्वासित देशासाठी धोकादायक

तसंच रोहिंग्यांविषयी त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. रोहिंग्यांचा जिहादी शक्तींशी संबंध आहे. त्यांच्या हिंसक कारवायांमुळे त्यांना त्या देशातून हाकलून लावलं.  त्यांना आपल्या देशात घेतल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. देशातील संसाधानांवर परिणाम होईल. त्यामुळे त्यांना भारतात प्रवेश नको. सरकारचीही हीच भूमिका आहे याचा आनंद आहे असं मत मोहन भागवतांनी व्यक्त केलं आहे.

...तरंच काश्मिर प्रश्न सुटेल  

त्यांनी काश्मिरच्या मुद्दयालाही आपल्या भाषणात स्पर्श केला. काश्मिर खोऱ्यातल्या जनतेला भारताच्या आत्मियतेचा अनुभव आला पाहिजे.

काश्मिर खोऱ्यात शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी सरकारनं विशेष सुविधा दिल्या पाहिजेत.काश्मिरातील पाकिस्तानच्या कुरापतींमुळे सीमेवरील गावातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यांना योग्य त्या सोयी मिळाल्या पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं. जम्मू - काश्मिर भारताचा अविभाज्य घटक असल्याचंही ते यावेळी म्हणाले.तसंच काश्मिरी पंडितांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे असंही भागवत म्हणाले. जम्मू आणि लडाखला सापत्न वागणूक दिली गेल्याचं त्यांनी सांगितलं.या सगळ्या उपायांची  अंमलबजावणी केली तरंच काश्मिर प्रश्न सुटेल असं ते म्हणाले.

केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये जिहादी कारवाई

केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये जिहादी कारवाई होतं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच या जिहादींना स्थानिक सरकार पाठीशी घालत असल्याची टीकाही त्यांनी केली. याला चाप बसायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं.

या दोन्ही राज्यांमध्ये अल्पसंख्याक लोकसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे.

जीडीपी हे  मानक चुकीचं

जीडीपी हे मानक चुकीचं असल्याचं अर्थशास्त्रशज्ञ म्हणतात असं मत त्यांनी व्यक्त केलं. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला काम मिळावं असंही ते म्हणाले. जीडीपीमध्ये गृहउद्योगांचा समावेश होत नाही. तो समावेश केला गेला पाहिजे असंही ते म्हणाले. सरकारने बरंच काम केलंय पण अजूनही बरंच काम केलं गेलं पाहिजे अशी भावना लोकांच्या मनात असल्याचंही ते म्हणाले . अंतराष्ट्रीय पातळीवर भारत पहिल्यांदा झेपावत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

याशिवाय शेतकरी प्रश्न ,शिक्षण या मुद्द्यंवरही त्यांनी भाष्य केलं. राष्ट्र बनत नसतात तर जन्म घेत असतात असंही ते म्हणाले. विजयादशमी 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी विजयादशमीचा संघाकडून उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2017 11:24 AM IST

ताज्या बातम्या