सरसंघचालक मोहन भागवतांकडून कथित गोरक्षकांना कानपिचक्या

सरसंघचालक मोहन भागवतांकडून कथित गोरक्षकांना कानपिचक्या

गोरक्षणाच्या मुद्यावरून हिंसाचार मान्य होणार नाही, असं केल्यानं मुळ मुद्यालाच नुकसान पोहोचते असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे.

  • Share this:

10 एप्रिल : गोरक्षणाच्या मुद्यावरून हिंसाचार मान्य होणार नाही, असं केल्यानं मुळ मुद्यालाच नुकसान पोहोचते असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे.

भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. गोहत्या बंदीचा कायदा संपूर्ण देशात केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

राजस्थानमधल्या अल्वर इथं गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर भागवतांच्या या वक्तव्याला महत्वा प्राप्त झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 02:45 PM IST

ताज्या बातम्या